इंदापूर ता.प्रतिनिधी सचिन शिंदे
मागची दोन तीन वर्षे संजय नावाच्या व्यक्तीने गाजविली आहे. एक म्हणजे संजय दत्त, दुसरे संजय राऊत टीव्ही वरील बातम्या चॅनेल लावला की राऊत साहेब हमखास असायचे आणि तिसरे म्हणजे संजय राठोड.त्यांच्या बद्दल ऐकलेच आहे.
या सगळ्या पलिकडे TRP प्रणित विदर्भातील संजय वायाळ कोविड काळात सगळ्यांना मदत करत होते,त्या काळी मल्टिनॅशनल कंपन्या काही कामगारांना कामावरून काढून काहींचे वेतन कमी करत होते पण यांच कामगाराना मदत, तसेच किराणा आणी इतर वस्तू पुरवत होते ते म्हणजे इश्वेद चे संस्थापक आणी संचालक माननीय संजय वायाळ. कोविड काळात त्यांनी आपल्यातील सहृदयी व्यावसायिक दाखवून दिली.
कोरोना काळात ज्यांच्या घरचा आधार गेला त्यांना नोकऱ्या दिल्या, विशेष करुन विधवा, शेतकऱ्याच्या मुला,मुलींना आधार दिला.
त्यांना कोणी विचारलं तुमचा टर्न ओव्हर किती तेव्हा ते एक समाधानी उत्तर देतात “टर्न ओव्हर पेक्षा मी समाधान बघतो. माझं पण आणि कामगारांचे ही. शेतकऱ्याबद्दल आस्था असणारे संजय सर अनेक विधवा, निराधार आणी गरीब मुलांचे पालक आहेत.
मनमोकळा स्वभाव, सेवाभावी वृत्ती, सुसंस्कृत पणा, विद्वत्ता, आणी आधुनिकता हे त्यांचे स्वभाव विशेष.
20 रुपये रोजंदारी पासून 50,60 कोटीपर्यंत चा प्रवास थक्क करणारे आहे. शेतकऱ्यांना आणी ग्राहकाला विषमुक्त उत्पादन तसेच अधिक उत्पन्न देणारे बियाणे आणी उत्तम जागतिक बाजारपेठ हे सगळं संजय यांनी उपलब्ध करुन दिलं आहे.
गरीब, शेतकरी आणी निराधारांना मदत करणारा हा उद्योजक आहे. यांनी आपल्या वाढदिवस निमित्त गरीब विद्यार्थ्यांना पाच हजार आणी त्यांचा पुस्तकांचा वार्षिक खर्च देऊन त्यांनी ‘इश्वेद शिष्यवृत्ती’सुरु केली.सिंदखेड राजा येथे इश्वेद चे मदत कार्य अखंडित चालु आहे.अशा जागतिक उद्योजकाचे सगळीकडून आभार व्यक्त होत आहे.