माणसांची मने वळवण्यात देवेंद्र फडणवीस तरबेज नेता-शरद पवार यांची टीका की प्रशंसा ?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निकाल ऐकून धक्का बसला आहे असं म्हणत विविध मार्गांनी माणसं वळवणे फडणवीसांचे काम आहे, माणसं वळविण्यास फडणवीस पटाईत व तरबेज आहेत, अशी खोचक टिका शरद पवारांनी फडणवीसांवर केली आहे.भाजपला आम्हाला पाठिंबा देणाऱ्या अपक्षांना आपल्या बाजूने वळवण्यात यश आले. त्यामुळे हा निकाल लागला. हा चमत्कार मला मान्य करावे लागेल असेही त्यांनी म्हटले.
शुक्रवारी झालेल्या राज्यातील राज्यसभेच्या सहा जागेवर निवडणूक झाली होती. याचा आज पहाटे तीन वाजता निकाल आला. हि निवडणूक अत्यंत चुरशीची व प्रतिष्ठेची करण्यात आली होती. राज्यसभा निवडणूक निकाल राज्यात मोठे राजकीय नाट्य पाहण्यास मिळाले. भाजपने घेतलेल्या आक्षेपानंतर शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांचे मत बाद ठरवण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड, काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांचे मत वैध धरण्यात आले आहे. तर महाविकास आघाडीने भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार आणि अपक्ष आमदार रवी राणा यांच्या मतावर आक्षेप घेतला होता. निवडणूक आयोगाने दोघांचेही मत वैध ठरवले आहे. पण, सुहास कांदेंच मत अवैध ठरविण्यात आले आहे. त्यामुळं सहा जागेसाठी झालेल्या निवडणुकीता आता भाजपाला तीन जागा तर महाविकास आघाडीला तीन जागेवर विजय मिळला आहे, दरम्यान निकालानंतर आता विविध राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निकाल ऐकून धक्का बसला आहे असं म्हणत विविध मार्गांनी माणसं वळवणे फडणवीसांचे काम आहे, माणसं वळविण्यास फडणवीस पटाईत व तरबेज आहेत, अशी खोचक टिका शरद पवारांनी फडणवीसांवर केली आहे. भाजपला आम्हाला पाठिंबा देणाऱ्या अपक्षांना आपल्या बाजूने वळवण्यात यश आले. त्यामुळे हा निकाल लागला. हा चमत्कार मला मान्य करावे लागेल असेही त्यांनी म्हटले. देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांना विविध मार्गाने या अपक्षांना आपल्या बाजूने वळवण्यात यश आले असल्याचे पवार यांनी म्हटले.राज्यसभा निवडणूक निकाल राज्यात मोठे राजकीय नाट्य पाहण्यास मिळाले. भाजपने घेतलेल्या आक्षेपानंतर शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांचे मत बाद ठरवण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड, काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांचे मत वैध धरण्यात आले आहे. तर महाविकास आघाडीने भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार आणि अपक्ष आमदार रवी राणा यांच्या मतावर आक्षेप घेतला होता. हि निवडणूक भाजपाने अत्यंत चुरशीची तसेच प्रतिष्ठेची केली होती. तसेच फडणवीस हे माणसं वळविणे हेच काम असल्याची टिका शरद पवारांनी केली आहे..

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here