माढा तालुक्यातील दारफळ (सीना) या गावातील केदार बारबोले यांचा महाराष्ट्रात बोलबाला.

माढा तालुक्यातील दारफळ( सीना) या छोट्याशा गावातील केदार प्रकाश बारबोले या तरुणाने जिद्द चिकाटी आत्मविश्वास या सर्वांच्या बळावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या स्पर्धेत महाराष्ट्र राज्यात सहावा क्रमांक पटकावला. केदार बारबोले हे आता पोलीस उपायुक्तपदी विराजमान होणार आहेत. मित्र परिवाराने केदार सह त्यांच्या आईची भव्य अशी गावातून वाजत गाजत मिरवणूक काढून सत्कार केला. आणि त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव केला. सर्वच स्तरातून केदारचे विशेष कौतुक केले जात आहे, कारण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पहिल्याच दिलेल्या परीक्षेत केदारने हे घवघवीत यश संपादन केले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होणं हे काही तरुणांचे ध्येय असतं, कारण ही परीक्षा उत्तीर्ण होणारे तालुका तसेच जिल्हास्तरावर अधिकारी म्हणून काम करतात. प्रतिष्ठेशिवाय चांगला पगारही मिळतो, त्यामुळे पदवी झाली की काही विद्यार्थी याच तयारीला लागतात. काहींचे आई-वडील नोकरीवर असल्यास ,ही परीक्षा उत्तीर्ण होणं त्यांना सोपं जातं .परंतु बोटावर मोजण्याजोगेच विद्यार्थी कठीण परिश्रम घेऊन ही परीक्षा उत्तीर्ण होतात .असंच काहीसं हे यश केदार बारबोले या युवकांना मिळवलं. त्यासाठी त्याला मदत झाली ती आईची, कारण केदार लहान असतानाच त्याचे वडील प्रकाश यांचे 2008 ला निधन झाले. नंतर आईनं केदारला शक्य ती मदत केली .हिम्मत दिली, स्वतः मेहनत जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर केदार आत्ता एम.पी.एस.सी परीक्षा उत्तीर्ण होऊन डी. वाय. एस .पी होणार आहे. केदारची परिस्थिती ही तशी प्रतिकूल होती. दोन पत्र्यांच्या खोलीत त्यांनी दिवस काढले होते. केदारने आई-वडिलांचे जवळून कष्ट पाहिले होते .माढ्यातील पतसंस्थेत केदारचे वडील सायकलवरून कामाला ये जा करीत असायचे. केदारने या परीक्षेमध्ये 593 गुण प्राप्त करून राज्यात सहावा क्रमांक पटकावला. दोन पत्रांच्या खोलीत राहणाऱ्या केदारने मिळवलेलं हे यश खरच कौतुकास पात्र आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here