माढा,कुर्डूवाडीमध्ये भाजपची ताकद वाढणार.भारतीय जनता पार्टीच्या माढा तालुका, व्यापारी सेल तालुका अध्यक्ष पदी निलेश सुराणा यांची निवड.

कुर्डूवाडी: कुर्डूवाडी येथील प्रसिद्ध व्यापारी व सामाजिक नेते नीलेश सुराणा यांची माढा तालुका भारतीय जनता पार्टीच्या व्यापारी सेल अध्यक्षपदी निवड करण्यात आली.भाजपचे नेते योगेश बोबडे यांच्या हस्ते अध्यक्ष पदी निवड करण्यात आल्याचे पत्र देण्यात आले .या वेळी युवा मोर्चा तालुका अध्यक्ष उमेश पाटील, कुर्डूवाडी शहर अध्यक्ष शंकर बागल, संघटक अनंत राऊत, अनुसूचित मोर्चा शहर अध्यक्ष बालाजी गायकवाड,सुहास सरडे उपस्थित होते. नीलेश सुराणा यांची माढा भाजपा सेल तालुका अध्यक्ष पदी निवड झाली आहे असे समजताच कुर्डूवाडी येथे व्यापारी व मित्रानी फटाके व पेढे वाटुन आनंद व्यक्त केला. निलेश सुराणा यांचा कुर्डूवाडी शहर व ग्रामीण भागात दांडगा मित्र परिवार आहे. त्यामुळे भाजप पक्षाला पक्ष वाढीस निलेश सुराणाच्या रुपात चांगले नेतृत्व मिळाले आहे.कुर्डूवाडी नगरपालिका निवडणुकी करिता निलेश सुराणा यांचे नाव अग्रेसर असणार आहे कारण त्यांचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणावर असून ते गोरगरीब लोकांसाठी कोणत्याही अडचणीसाठी धावून जातात सर्वांना सहकार्य करतात आणि त्यांना मानणाऱ्या लोकांकडूनच असे ऐकण्यास मिळत आहे की आमचा नगरपालिकेचा उमेदवार हे निलेश सुराणाच असतील आणि केवळ त्याचमुळे ते कुर्डूवाडी नगरपालिकेमध्ये आपले स्थान पक्के करण्यास खंबीर आहेत. सुराणा यांचे सामाजिक क्षेत्र असो किंवा राजकीय क्षेत्र यामध्ये चांगले काम असल्यामुळे भाजपाला त्यांची मदत होणार आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाची कुर्डूवाडी मध्ये ताकद वाढणार आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here