इंदापूर येथे तालुका युवक काँग्रेसच्या कमिटीची नवीन कार्यकारणी लवकर जाहीर करण्यात येणार आहे. इंदापूर तालुक्यात भविष्यात एक मजबूत टीम सक्रिय असेल,जनतेची कामे केली तर कोणीही पराभूत करू शकणार नाही.आगामी काळात युवकांना पदाच्या माध्यमातून लोकोपयोगी कामे करता यावीत.समाजातील गोरगरीब, दलित, वंचित, उपेक्षित आणि तळागाळातील नागरिकांना न्याय देण्यासाठी काँग्रेस पक्षाने सुरुवातीपासूनच आपली ध्येयधोरणे राबवली आहेत. त्या ध्येयधोरणांमुळेच काँग्रेस पक्षावर सर्वसामान्य जनतेचा आजही विश्वास कायम आहे. काँग्रेसमधील नेतृत्वच देश आणि राज्याला पुढे नेऊ शकते, अशी भावना युवा वर्गातही निर्माण झाली आहे. म्हणूनच आजचे युवक काँग्रेसकडे आकर्षित होऊ लागले आहेतयासाठी लवकरच नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात येणार आहे. असे आज इंदापूर तालुका युवक अध्यक्ष मिलिंद साबळे यांनी इंदापूर येथे इंदापूर तालुका युवक काँग्रेसच्यावतीने विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यानसाठी आयोजित करण्यात आलेल्या बेठकीत यांनी संवाद साधला.तसेच महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष कुणालजी राऊत यांच्या आदेशानुसारआणि महाराष्ट्र प्रदेश युवक सरचिटणीस विजयसिंह चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर युवक काँग्रेसच्या वतीने माझे गाव, माझी शाखा अभियान इंदापूर तालुक्या मध्ये राबवण्यात येईल..यावेळी इंदापूर युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अरुण राऊत,इंदापूर शहर युवक काँग्रेस उपाध्यक्ष सुफियान जमादर,इंदापूर युवक सरचिटणीस संदीप शिंदे ,अध्यक्ष इंदापूर शहर सोशल मीडिया नईम शेख,किरण पासगे,संतोष सोनटक्के,अनिकेत जाधव, योगेश सुतार, संतोष शेंडे,सिद्धार्थ गायकवाड व युवक काँग्रेसचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते.