माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांचा वाढदिवस शेटफळ हवेलीमध्ये उत्साहात साजरा.

इंदापूर: महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री व भाजपाचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त इंदापूर तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हर्षवर्धन पाटील यांनी वाढदिवस हा साध्या व समाजोपयोगी कार्यक्रमाने करावा असे आवाहन केल्यानंतर शेटफळ हवेली येथील युवकांनी इतर अवास्तव खर्च न करता गावातील युवकांनी आज अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तू वाटून हा वाढदिवस साजरा केला.अंगणवाडीला शालेय उपयोगी वस्तू वाटल्यानंतर शाळेतर्फे सुभाष चव्हाण सर यांनी सर्वांचे आभार मानले.तत्पूर्वी काल सकाळी 8 वाजता शेटफळ हवेलीचे ग्रामदैवत असलेले श्री भैरवनाथ मंदिरामध्ये जाऊन लोकप्रिय नेते हर्षवर्धन पाटील यांना आरोग्यमय स्वास्थ्य लाभावे याकरिता श्री भैरवनाथा चरणी युवकांकडून प्रार्थना करण्यात आली.
शेटफळ हवेली मध्ये झालेल्या या वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये सचिन दरेकर(सर),हरिभाऊ पुंडे,श्रीयश नलवडे,सुयोग सावंत,संजय शिंदे,अतुल येवले,सचिन शिंदे,शरद शिंदे,विजय शिंदे,विजय कानगुडे,बाळासाहेब नलवडे,इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here