महाराष्ट्रात सत्तांतर होऊनही इंदापूर तालुक्यात मात्र त्याचा काही परिणाम झालेला दिसून येत नाही. माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर तालुक्यासाठी कोट्यावधी रुपयाचा निधी आणून एक विक्रम प्रस्थापित केला आहे. सत्तांतर झाल्यानंतर थोडा वेळ ब्रेक घेऊन पुन्हा एकदा जोमाने इंदापूर तालुक्यात विविध विकासकामांचा धडाका दत्तामामांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे आणि याचाच एक भाग म्हणून उद्या तालुक्याच्या विविध भागांमध्ये विकास कामांची भूमिपूजन लोकप्रिय खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते होणार आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे या शुक्रवार दिनांक (२१) रोजी इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर येणार असून ७० कोटी रुपयांचा विविध विकास कामांचे भूमिपूजन उद्घाटन त्यांच्या शुभहस्ते होणार आहे.यावेळी माजी राज्यमंत्री व आमदार दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
या दोऱ्याला दुपारी १ वाजता सुरुवात होणार असून जाचकवस्ती येथे सणसर-३९फाटा ते काझड अकोले रस्त्याचे भूमिपूजन होणार आहे.( रक्कम १५ कोटी).👉 दुपारी दीड वाजता मौजे उद्धट येथे पवारवाडी उद्धट सपकाळवाडी रस्ता तसेच गावांतर्गत विविध विकास कामाचे भूमिपूजन व सभा होणार आहे. (मंजूर रक्कम १२ कोटी २ लक्ष). 👉 2 वाजता मौजे उद्धट येते “माझा मतदारसंघ माझा अभिमान” या अभियाना अंतर्गत राज्यस्तरीय गुणवंत खेळाडूंची संवाद साधला जाणार आहे.👉 दुपारी ३ वाजता मौजे कळंब येथे बंबाळवाडी -चव्हाणवाडी परीटवाडी ते फडतडे नॉलेज सिटी रस्त्याचे भूमिपूजन.( मंजूर रक्कम ८ कोटी ६० लाख).👉 दुपारी ३.३० मिनिटांनी शिरसटवाडी येथे शेळगाव स्टॅन्ड शिरसटवाडी ते निमसाखर रस्त्याचे भूमिपूजन.( मंजूर रक्कम १२ कोटी ३५ लाख).👉 सायंकाळी चार वाजता सुगाव येथे जलजीवन मिश्रांतर्गत नळ पाणीपुरवठा योजनांचे भूमिपूजन. (मंजूर रक्कम ४६ लाख) व गाव भेटू उपक्रमांतर्गत ग्रामस्थांशी संवाद.👉 सायंकाळी पाच वाजता मौजे आजोती येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन व जाहीर सभा. (रक्कम २१कोटी ५५ लक्ष)
यावेळी खासदार सुप्रिया सुळे व आमदार दत्तात्रय भरणे यांच्या विविध विकासकामे व भूमिपूजन कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
Home Uncategorized माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून इंदापूर तालुक्यात विविध विकास कामांचा धडाका सुरूच,...