माजी राज्यमंत्री आ.बच्चू कडू आणि कार्यकर्ता यांच्यातील जिव्हाळ्याच्या नात्याची टेंभुर्णीमध्ये अनोखी झलक.

प्रतिनिधी इंदापूर : आपल्या अभिनव आंदोलनाबद्दल बच्चू कडू महाराष्ट्रात विशेष प्रसिद्ध आहेत.महाराष्ट्रामध्ये ते “बच्चूभाऊ” या नावाने लोकप्रिय असून “अपना भिडू बच्चू कडू” ही त्यांच्या समर्थकांची आवडती घोषणा आहे. महाराष्ट्रात प्रचंड लोकप्रियता मिळवलेल्या या नेत्याने कार्यकर्त्यांशीही जिव्हाळ्याचे संबंध ठेवल्याने कार्यकर्त्यांमध्येही त्यांच्याविषयी विशेष प्रेम आहे आणि याचाच प्रत्येय नुकताच टेंभुर्णी मध्ये आला. बच्चू कडू यांच्या प्रेमापोटी सोलापूर जिल्ह्यातील रुई (माढा) येथील दिपक लांडगे यांनी आपल्या गाडीत चक्क बच्चू कडू यांची मुर्ती साकारली आहे.
मौजे रूई (ता.माढा जि.सोलापूर) गावातील प्रहार संघटनेचे कार्यकर्ते दीपक लांडगे हे गेली दोन अडीच वर्षापासून सर्वसामान्य, कष्टकऱी, शेतकरी, दिव्यांगांचे दैवत मानले जाणारे आमदार बच्चुभाऊ कडू यांच्या विचाराने प्रेरित होऊन समाजसेवेचं काम करत असतात. त्यांनी आपल्या चार चाकी गाडीमध्ये आमदार बच्चू कडू यांचे फोटोरुपी मंदिर बसवून त्या मंदिराराची फित दि.२ फेब्रुवारी रोजी टेंभुर्णी येथे आमदार बच्चूभाऊ कडू त्यांच्या शुभहस्ते कापली. आमदार बच्चू कडू यांनी त्यांच्या कार्याला खूप शुभेच्छा दिल्या आणि समाधान व्यक्त केले. आणि मधूनच नेता आणि कार्यकर्त्यांच जिव्हाळ्याचं, आपलेपणाचं नातं असतं हे दीपक लांडगेंनी दाखवून दिल आहे.
यावेळी दीपक लांडगे बोलताना असे म्हणाले की,”आमदार बच्चुभाऊ कडू हे सर्वसामान्य, शेतकरी, कष्टकरी, दिव्यांग, अनाथ ,विधवा माता-भगिनी, गरीब रुग्ण, वंचित, पीडित यांच्यासाठी न्याय देण्याचे काम करत असतात, त्याचबरोबर शेतकरी हिताचे, तसेच अपंग बांधवांचे अनेक शासन निर्णय बच्चू कडू यांनी संघर्ष करीत प्रसंगी अनेक आंदोलने करून लोकहितासाठी स्वतः वर ३५० च्या आसपास गुन्हे दाखल झाले, तरीही ते अन्याय होत असलेल्या ठिकाणी चार हात करण्यास मागे पुढे पाहत नाहीत”. चळवळीत काम करत असताना कार्यकर्ता म्हणून बच्चू कडू यांच्या आंदोलन कार्याला प्रोत्साहित होऊन आपल्या गाडीत बच्चू कडू यांची मुर्ती आपल्या गाडीत बसवल्याचे लांडगे म्हणाले.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here