नुकत्याच झालेल्या गोवा विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने निवडणुकीमध्ये मोठे यश संपादन केले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने ही निवडणूक लढवली होती या निवडणुकीत पक्षाला मोठे यश संपादन करता आले. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी या यशाबद्दल राज्याचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांचे त्यांनी अभिनंदन केले.हर्षवर्धन पाटील म्हणाले की,’ गोव्यातील जनतेने भारतीय जनता पक्षावर विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षाला आपले प्रतिनिधित्व करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. भाजपने राबवलेल्या विविध योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचल्याने नागरिकांनी या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या बाजूने कौल दिला आहे. भाजपचा हा विजय येणार्या पुढच्या निवडणुकीसाठी नांदी ठरेल.’