इंदापूर -इंदापूर तालुक्यातील निरवांगी नजीकचे दगडवाडी येथील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री क्षेत्र नंदिकेश्वर देवस्थानच्या विकासासाठी रु 15 लाख व शेळगाव येथील प्रसिद्ध श्री संत मुक्ताबाई देवस्थान भक्त निवास उर्वरित कामांसाठी रु 15 लाख याप्रमाणे तीर्थक्षेत्र विकासासाठी एकूण 30 लाख रुपयांचा निधी भाजप नेते, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या प्रयत्नातून मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती इंदापूर तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अँड शरद जामदार यांनी आज दिली.सदरचा निधी पुणे जिल्हा वार्षिक योजना सन 2022-23 मधून तीर्थक्षेत्र विकास योजनेतून पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुकताच 18 जाने. रोजी मंजूर केला आहे. पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी हर्षवर्धन पाटील यांना निधी मंजूर झाल्याचे पत्राद्वारे कळविले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे यांचे नेतृत्वाखालील बाळासाहेबांची शिवसेना व भाजप सरकारच्या माध्यमातून व पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचे सहकार्यातून आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या प्रयत्नांमुळे श्रीक्षेत्र नंदिकेश्वर व शेळगाव देवस्थानच्या विकासासाठी हा निधी मंजूर झाल्याची माहिती तालुकाध्यक्ष अँड शरद जामदार यांनी दिली.
Home Uncategorized माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या प्रयत्नातून नंदिकेश्वर देवस्थान व संत मुक्ताबाई देवस्थानच्या...