माजी नगरसेवक अनिकेत वाघ यांचे कार्यतत्परतेवर दत्तनगरकर खुश..मानले अनिकेत वाघ यांच्या आभार.

इंदापूर शहरातील दत्तनगर रोड हा मॉर्निंग वॉक करण्यासाठी आणि शतपावली करण्यासाठी इंदापूरकरांचा सर्वात पसंतीचा रोड आहे. या रोड वरून शेकडो इंदापूरकर ये-जा करत असतात. या रोडच्या कडेने नगरपालिकेने पथदिवे बसवल्यामुळे अगदी आत्मविश्वासाने लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत फिरण्यासाठी ही या रोडचा वापर करतात. परंतु गेल्या महिन्यापासून दत्तनगरला कॅनल जवळचे पथदिवे बंद पडल्याने त्या ठिकाणी भरपूर अंधार पडत होता. त्या अंधाराच्या ठिकाणी अनेक भयानक अनुचित प्रकारही घडलेले होते. भविष्यात असे प्रकार घडू नयेत म्हणून दत्तनगर मधील काही सतर्क नागरिकांनी व राहुल गुंडेकर यांनी त्या ठिकाणी पोथदिवे बसवणे खूप गरजेचे आहे असे निदर्शनास आणून दिले यापूर्वी दत्तनगरकरांनी वेळोवेळी ही गोष्ट नगरपालिकेच्याही निदर्शनास आणून दिलेली होती परंतु नगरपालिका याकडे दुर्लक्ष करत असल्याचे जाणवत होते. त्यामुळे नाईलाजाने राहुल सिनेमाचे मालक राहुल गुंडेकर व दत्तनगर मधील काही युवक यांनी माजी नगरसेवक अनिकेत वाघ यांना फोनद्वारे संपर्क करून दत्तनगरला बोलवले. माजी नगरसेवक अनिकेत वाघ यांनी कार्यतत्परता दाखवत व गांभीर्यता ओळखत आपल्या कार्यकर्त्यांना त्वरित दोन पथदिवे बसवा अशा सूचना केल्या आणि अवघ्या एक तासात दोन दिवे वेगवेगळ्या दिशेने लावून या ठिकाणी हा प्रश्न मार्गी लावला आणि यामुळे दत्तनगर मधील युवकांनी आज अनिकेत वाघ यांना बोलवून आभार मानले. यावेळी माजी नगरसेवक स्वप्नील राउतही उपस्थित होते.पथदिवे बसवणे ही जरी छोटी बाब असेल तरी जो अनुचित प्रकार घडलेला होता तो खूप भयानक होता त्यामुळे यापुढे अशा गोष्टी घडू नयेत म्हणून पथदिवे बसवणे गरजेचे होते आणि अनिकेत वाघ यांच्या प्रयत्नातून ते बसलेत म्हणून दत्तनगरकर अनिकेत वाघ यांच्या कार्यपद्धतीवर समाधानी आहेत.



दरम्यान दत्तनगर रोडवरील ड्रेनेजचे काम हे डांबरीकरण फोडून होत असल्याचे या नागरिकांनी माजी नगरसेवक यांच्या निदर्शनास आणून दिले. दोन्ही बाजूनी जागा असताना रस्ता मधूनच फोडून ड्रेनेज करू नका अशी विनंती ही माजी नगरसेवक अनिकेत वाघ यांना दत्तनगरकरांनी दिली.’असा रस्ता पुन्हा होणे नाही’ त्यामुळे हा रस्ता फोडू नका व ड्रेनेज लाईन रस्त्याच्या बाजूने घ्यावी अशी मागणीही या नागरिकांनी माजी नगरसेवक अनिकेत वाघ यांच्याकडे केली.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here