मागण्यांची अंमलबजावणी सुरू होईपर्यंत छत्रपती संभाजीराजेंचा उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार.

मुंबई:मराठा समाजाच्या मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी छत्रपती संभाजीराजे आमरण उपोषणास बसले आहेत.आज दि. २७ फेब्रुवारी रोजी सायं. ६ वा.राज्य सरकारच्या वतीने गृहमंत्री दिलीप पाटील हे आझाद मैदान येथे उपोषणस्थळी आले. नामदार वळसे पाटील यांनी छत्रपती संभाजीराजे यांचेसह मराठा समन्वयकांशी चर्चा केली व छत्रपती संभाजीराजेंना उपोषण सोडण्याची विनंती केली. मात्र छत्रपती संभाजीराजेंनी समाजाच्या मागण्यांबाबत सरकारकडून लेखी निर्णय व भरीव अंमबजावणी सुरू होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याची घोषणा केली आहे.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here