माकणे ग्रामपंचायतीवर प्रथमच उपसरपंच पदी महिलाराज तर पूर्व भागात कुणबी राज..

वैभव पाटील : पालघर जिल्हा प्रतिनिधी
पालघर तालुक्यातील सफाळे रेल्वेच्या पश्चिमेकडे प्रतिष्ठेची असलेली माकणे ग्रामपंचायत या माकणे ग्रामपंचायतीच्या इतिहासात प्रथमच महिला उपसरपंच होण्याचा मान मा.तनुजा बबन घरत यांना मिळाला आहे .मागील 18 डिसेंबर रोजी माकणे ग्रामपंचायतची निवडणूक पार पडली . या ग्रामपंचायतीवर मगील 35 वर्षा पासून बहुजन विकास आघाडीची एक हाती सत्ता होती. पण या वेळी श्री दत्त पॅनलने बहुजन विकास आघाडीची सत्ता खालसा केली.श्री दत्त पॅनलचे प्रमोद शेलार सरपंच पदी विराजमान झाले.तर 29 डिसेंबर रोजी उपसरपंच पदाची निवड करण्यात आली. यावेळी प्रथमच या ग्रामपंचायतीवर महिला उपसरपंच तनुजा बबन घरत त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली . त्यामुळे परिसरात त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.पालघर तालुक्यातील सफाळे रेल्वेच्या पश्चिमेकडे प्रतिष्ठेची असलेली माकणे ग्रामपंचायत या माकणे ग्रामपंचायतीच्या इतिहासात प्रथमच महिला उपसरपंच होण्याचा मान मा.तनुजा बबन घरत यांना मिळाला आहे.त्यामुळे परिसरात त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.तर पालघर तालुक्यातील पूर्वेकडील खामलोली ग्रामपंचायतीवर बहुजन विकास आघाडीचे तुषार भालचंद्र पावडे यांची उपसरपंच पदी निवड करण्यात आली.तर नावझे ग्रामपंचायत बिनविरोध होऊन उपसरपंच पदी प्रफुल वसंत पाटील व कोकणेर ग्रामपंचायत वर ग्रामविकास आघाडी पुरस्कृत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्वरूपा संजय शेलार यांची उपसरपंच पदी निवड झाली.त्यामुळे परिसरात यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here