मांजरगाव ग्रामपंचायत कडून आज लंपी लसीकरण शिबिराचे आयोजन.

प्रतिनिधी – देवा कदम
मांजरगाव ग्रामपंचायत च्या वतीने आज दि .१८ रोजी लंपी या आजाराचे लसीकरण शिबिराचे आयोजन केलेले आहे.सध्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात फैलावत असलेला जनावरा मधील आजार म्हणजे लंपी या आजाराने अनेक भागात पशुधन धोक्यात आलेले आहे व शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये ही लस उपलब्ध नसल्याने सरकारी यंत्रणेकडून लसीकरण केले जात नाही. अनेक गावांमध्ये लंपी सदृश्य लक्षणे असलेली जनावरे पाहायला मिळत आहे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शासकीय लसीची वाट न पाहता खाजगीतुन लस उपलब्ध करून गावातील सर्व जनावरांना ती लस दिली जावी व आपल्या गावातील पशुधन सुरक्षित राहावे यासाठी ग्रामपंचायत मांजरगाव ने ही लस खरेदी केली असून उद्या ती लस प्रत्येक जनावरांना दिली जाणार आहे . गावामध्ये मोठ्या प्रमाणात दुग्ध व्यवसाय केला जात असून जनावरांची संख्या जास्त आहे त्या दृष्टीने ही लस प्रत्येक जनावरांना मोफत दिली जाणार आहे तरी प्रत्येक शेतकऱ्यांनी या शिबिराचा लाभ घेऊन आपल्या जनावरांना लस टोचून घ्यावी अशी विनंती ग्रामपंचायत च्या आदर्श सरपंच सौ.गायत्री कुलकर्णी , उपसरपंच श्री. आबासो चव्हाण , सर्व सदस्य यांनी मा. श्री.संतोष (आप्पा) पाटील यांचे मार्गदर्शनाने केली आहे .शासकीय लस उपलब्ध होण्यास उशीर झाला तर या आजारामुळे पशुधन धोक्यात येऊ शकते आणि हा संभाव्य धोका हा शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान करणारा होऊ शकतो म्हणून ग्रामपंचायतीने स्वनिधीतुन लस उपलब्ध करून ती सर्व जनावरांसाठी पशुवैद्यकीय दवाखाना उमरड चे डॉ.पवार तसेच स्थानिक प्रॅक्टिस करणारे सर्व डॉक्टरांची टीम लसीकरणास उद्या उपस्थीत राहणार आहे .तरी सर्वांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा ही विनंती आपल्या पशुधनाची काळजी आपणच घ्यावी . आजाराचे गांभीर्य लक्षात घेऊन ग्राम पंचायत च्या वतीने हे आरोग्य शिबीर घेण्यात येत आहे

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here