महिला सक्षमीकरणाचा ध्यास घेतलेली श्री समर्थ महिला पतसंस्था- सौ निता दिनकर देशमुख.

👉 सहकारातून समृद्धीकडे यशस्वी वाटचाल करत असलेल्या श्री समर्थ पतसंस्थेचा प्रथम वर्धापन दिन.
सोलापूर: सोलापूर शहर व जिल्ह्यातील तेरा महिलांनी एकत्र येऊन श्री समर्थ महिला नागरी सहकारी पतसंस्थेची सौ निता दिनकर देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर स्थापना केली.आज पासून एक वर्षांपूर्वी या 13 ही महिलांच्या मनात सुद्धा नव्हते की आपली एक महिलांची पतसंस्था काही दिवसात सुरू होईल व त्या पतसंस्थेस शहर व जिल्ह्यातून मोठा प्रतिसाद मिळेल तसं पाहिलं तर सौ निता दिनकर देशमुख यांच्याशी बोलताना त्यांनी सांगितले की या पतसंस्थेची निर्मिती ही अचानक निर्माण झालेल्या एका संकटातून उद्भवलेल्या परिस्थितीमुळे झालेली आहे.प्रत्येक यशस्वी पुरुषांच्यामागे एक स्त्री असते असे म्हटले जाते परंतु या ठिकाणी या पतसंस्थेच्या निर्मितीमध्ये ही पुरुषांच्या मागे त्यांच्या पत्नी खंबीरपणे उभ्या राहिल्या त्या सर्व व्यक्तींना 23 ते 25 वर्षाचा सरव्यवस्थापक व व्यवस्थापक पदाचा अनुभव होता मग त्यांच्या पत्नीने आता तुम्ही खूप काम केले आता आम्ही काहीतरी करतो म्हणून या पतसंस्थेची त्यांनी निर्मिती करण्याचे योजिले अशा खडतर प्रवासातून या पतसंस्थेची निर्मिती होऊन 12 महिने पूर्ण झालेली आहेत.व या 12 महिन्यांमध्ये संस्थेने 12 कोटीचा व्यवसाय पूर्ण केला असून साठ लाखाचे भाग भांडवल जमा केलेले आहे.सुरुवातीपासूनच सर्व अद्यावत सोयी सुविधा खातेदारांना देत असताना मायक्रो एटीएम,आरटीजीएस, एनईएफटी,क्यू आर कोड च्या माध्यमातून पैसा स्वीकारणे अशा सेवा देत आहोत.शहर व जिल्ह्यातील अनेक महिलांना एकत्र करून त्यांना व्यवसाय वाढीसाठी बचत गटाच्या माध्यमातून कर्ज वाटप करून त्यांना सक्षमपणे व्यवसाय करण्यासाठी व स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी श्री समर्थ पतसंस्था कार्य करत आहे.सौ निता देशमुख यांचे माहेर पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथील आहे तसं शेतकरी कुटुंबातील जन्म असल्यामुळे शिक्षण जेमतेम बारावीपर्यंतत झालेले त्यांच्या शेजारीच मामाचे घर होते मामा मोठ्या कष्टातून अभ्यास करून उपजिल्हाधिकारी झाले.जवळचे नातेवाईक भारत नाना भालके लहानपणापासूनच कारखान्याच्या बॉयलरच्याा पूजेसाठी नाना घेऊन जात असत .2000 साली त्यांचा विवाह सोलापुरातील दिनकर देशमुख यांच्याशी झाला देशमुख परिवाराची ही परिस्थिती जेमतेम होती परंतु त्यांचा स्वभाव व व्यक्तिमत्व पाहून त्यांची निवड दत्तात्रय भोसले मामा यांनी त्यांच्यासाठी केली अशा रीतीने त्यांचा कारखाना व पती दिनकर देशमुख यांचा सहकारातील 25 वर्षाच्या अनुभवामुळे सहकाराविषयी घरात कायमच चर्चेचा विषय असायचा.लग्नापासूनच त्यांनी विविध ट्रस्टच्या माध्यमातून सामाजिक कार्यात सहभाग होता . पती दिनकर देशमुख हे सहकार व समाजकारण या क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असायचे नोकरीमध्ये असताना त्यांना महाराष्ट्र शासनाचा गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार मुंबई येथे कामगार मंत्री राजेंद्र गावित यांच्या शुभहस्ते मिळाला तर समाजकारणातील प्रतिष्ठेचा महाराष्ट्र शासनाचा डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषणण पुरस्कार केंद्रीय मंत्री रामदास आठवले,समाज कल्याण मंत्री राजकुमार बडोले, व राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या शुभहस्ते नाशिक येथे मिळाला.याचा आदर्श घेऊन त्यांनी श्री समर्थ महिला नागरी पतसंस्थेची स्थापना केली.पहिल्या दिवसापासून पतसंस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक कार्यक्रम राबविण्यास सुरुवात केली. ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा कार्यक्रम, पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान , संक्रातीच्या निमित्ताने शहरातील विविध महिलांना एकत्र करून हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेऊन संक्रांतीच्या निमित्ताने वान लूटण्याचा कार्यक्रम केला अल्पावधीत केलेल्या कामाची दाखल घेऊन मराठा सेवा संघ सोलापूर जिल्हा यांच्या वतीने त्यांना महिला दिनाच्या निमित्ताने सन्मानित करण्यात आल.तसेच महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ सोलापूरच्या वतीने सन्मानित करण्यात आले. रिझर्व बँकेने सर्व सहकारी बँकांना बोर्ड ऑफ मॅनेजमेंट ची नेमणूक करण्याची सक्ती केली याचा आदर्श घेऊन श्री समर्थ महिला पतसंस्थेने महाराष्ट्रातील पहिले व्यवस्थापन मंडळ स्थापन करून एक नवा आदर्श निर्माण केला.या पतसंस्थेतील सर्व महिला संचालक बचतीचे महत्त्व महिलांना पटवून देत आहेत. थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे भावी आयुष्यातील खर्चाच्या तरतुदीसाठी छोटी छोटी बचत करण्याचा सल्ला देऊन त्यांना सक्षम करण्याचा प्रयत्न करत आहेत.प्रत्येक महिलांनी आपल्या मिळकतीतील थोडे तरी पैसे बाजूला काढून गुंतवून भविष्यातील अडचणीसाठी उपयोगी पडतील अशा पद्धतीने गुंतवण्याची सवय महिलांमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न संस्थेचे अध्यक्ष सौ निता दिनकर देशमुख करत आहेत.भविष्यातील योजना विषयी बोलताना त्यांनी सांगितले की लवकरच कार्यक्षेत्र विस्तार करून पतसंस्थेच्या शाखा उघडण्याचा मनोदय व्यक्त केला.नुकतेच पतसंस्थेचे पहिले ऑडिट पूर्ण झाले असून त्यामध्ये पतसंस्थेला अ वर्ग मिळाला त्याबद्दल त्यांनी सर्व संचालक मंडळ ,कर्मचाऱ्यांना व सभासदांना श्रेय दिले.या पतसंस्थेच्या दैनंदिन कामकाजात व्यवस्थापक मंडळाचे अध्यक्ष श्री दिनकर देशमुख ,उपाध्यक्ष महावीर जाधव, विलास कोरे व सर्व सदस्य व संचालक मंडळ लक्ष देत आहेत.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here