सर्वांना बरोबर घेऊन जाणारी ताई अनिताताई खरात….
आज 30 जून गोरगरीब अनाथ वृद्ध विद्यार्थी कष्टकरी शेतकरी यांच्या हाकेला धावून जाणाऱ्या सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या अनिताताई नानासाहेब खरात यांचा वाढदिवस त्या खोरोची येथील रहिवाशी असून त्यांना आजपर्यंत सामाजिक क्षेत्रातील अनेक पुरस्कार मिळवण्याचा बहुमान मिळाला आहे.तालुक्यातील महिलांचे प्रश्न त्या हिरीरीने मांडतात तसेच शेतकरी वर्गासाठी नेहमी पुढाकार घेतात शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्यात त्या मिळून मिसळून राहतात,सिंधुताई सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली नेहमीच अनिताताईंनी अनाथ वृद्ध यांची सेवा केली आहे आणि आत्ता माई गेल्यानंतर माईंचा वारसा पुढे त्या चालवत आहेत.सामाजिक काम करायला कोणताही राजकीय वारसा ,श्रीमंती याची गरज नसते हे अनिताताई नेहमीच आपल्या कामातून दाखवून देतात. महिला दक्षता समिती व तेजपृथ्वी ग्रुप यांच्या माध्यमातून त्या सदैव जनतेच्या कामास तत्पर असतात.तेजपृथ्वी (ग्रुप) प्रतिष्ठान च्या माध्यमातून त्यांनी चांगले संघटन उभे करून नेहमी सामाजिक कामात अग्रेसर असतात तसेच महिलांचे प्रश्न महिला दक्षता कमिटीच्या माध्यमातून त्या अतिशय उत्कृष्ट काम करतात कोणत्याही महिलेने कधीही कॉल केला तरी त्या पोलीस स्टेशनला हजर असतात.आज 30 जून त्यांचा वाढदिवस आणि या वाढदिवसानिमित्त जनता एक्सप्रेस मराठी न्यूज कडून ताईंना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा.
Home Uncategorized महिला दक्षता समिती व तेजपृथ्वी ग्रुप यांच्या माध्यमातून त्या सदैव जनतेच्या कामास...