महिला कृषी तंत्रज्ञान सक्षमिकरण दिवस भाटनिमगावमध्ये उत्साहात साजरा.

आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी विभागाचे कर्मचारी, अधिकारी, कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ ,कृषी मित्र हे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष बांधावर जाऊन मार्गदर्शन करीत आहेत. महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत दिनांक 25 जून ते ०१जुलै या कालावधीत कृषी संजीवनी मोहीम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. याच मोहिमेअंतर्गत मौजे भाटनिमगाव येकृषी  महिला शेतीशाळेमध्ये तालुका कृषी अधिकारी श्री. बी. एस. रुपनवर व मंडळ कृषी अधिकारी श्री.जी.पी. सूर्यवंशी यांचे मार्गदर्शनाखाली दिनांक 27 जून 2022 हा दिवस महिला कृषी तंत्रज्ञान सक्षमीकरण दिवस म्हणून साजरा करण्यात आला.यावेळी भाटनिमगाव मधील रेखा देवकर, शिवगंगा देवकर, शोभा देवकर, सोनाली देवकर ,शैला एकाड ,स्वाती देवकर, आणि भाटनिमगाव मधील बहुसंख्य महिला व शेतकरी वर्ग उपस्थित होता. उपस्थित महिलांना बीबीएफ यंत्राची माहिती देण्यात आली. पीक स्पर्धा विजेते व रिसोर्स पर्सन सौ नंदाताई नंदकुमार देवकर यांनी त्यांचे क्षेत्रावर रुंद वरंबा सरी पद्धत यंत्राने मका पेरणी प्रात्यक्षिक दाखवले. रुंद वरंबा सरी पद्धतीमुळे रुंद वरंबे सरी पाडणे, पेरणी व खते देणे हे तिन्ही कामे एकाच वेळी होतात त्यामुळे पेरणी खर्चामध्ये बचत होते. हे यंत्र कोरडवाहू शेतीमध्ये जलसंधारणाच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त आहे. अधिक व सतत पावसामध्ये हे पद्धत उपयोगी ठरते या पद्धतीमुळे उत्पादनात 25 टक्के वाढ होते तसेच 20 ते 25 टक्के जलसंधारण होते त्यामुळे बीबीएफ यंत्राने पेरणी करण्याचे आवाहन कृषी विभाग करीत आहे. सादर शेतीशाळेमध्ये अवसरी बेडशिंगे आणि भाटनिमगाव या कार्यक्षेत्रांमधील कर्तव्यदक्ष कृषी सहाय्यक म्हणून ज्यांची ख्याती आहे अशा अनुपमा देवकर यांनी कृषी विभागाच्या विविध योजना, प्रमुख पिकांचे लागवड तंत्रज्ञान ,पौष्टिक तृणधान्यांचे महत्त्व व लागवड पद्धती,रासायनिक खतांचा संतुलित वापर आणि कृषी आधारित प्रक्रिया उद्योग याविषयी उपस्थित शेतकऱ्यांना व महिलांना बहुमूल्य असे मार्गदर्शन केले .

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here