महावितरणाच्या अधिकाऱ्यांविरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल करा- स्वाभिमानी शेतकरी पक्षाची मागणी.

महावितरण कडून शेतकऱ्याची कृषी पंप आणि साहित्य विनानोटिस जप्त.?
पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात महावितरण कडून शेतकऱ्यांचे कृषी पंप आणि साहित्य जप्त केले जात असून ही कारवाई बेकायदेशीर असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे .अशी कारवाई करणाऱ्या महावितरणच्या अधिकाऱ्यांविरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.दौंड तालुक्यातील शेतकर्यांच्या थकित वीज बिलापोटी आता महावितरणने धडक कारवाई केल्याचे चित्र आहे .या कारवाईत महावितरणने थेट शेतकऱ्यांचे स्टार्टर आणि पॅनल बॉक्स उचलून घेऊन जाण्यास सुरुवात केली आहे .काही शेतकऱ्यांनी स्टार्टर आणि पॅनल बॉक्स घेऊन जाऊ नका,अशी विनवणी केल्यानंतर ही कारवाई सुरूच आहे .वरिष्ठ अधिकारी अत्यंत मुजोर असल्याचा आरोप शेतकरी करतायेत. दौंड तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे महावितरण साहित्य घेऊन गेले आहे त्यामुळे आत्ता दौंड तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाले असून या मुजोर महावितरणच्या अधिकाऱ्यावर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. कोणताच राजकीय नेता या महावितरणच्या मुजोर पनावर बोलत नसून नेते मात्र तुपाशी आणि शेतकरी उपाशी असल्याचे चित्र दिसत आहे.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here