महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत दिनांक २५ जून ते ०१ जुलै २०२२ या कालावधीत कृषी संजिवनी मोहीम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे .आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी कृषी विभागाचे कर्मचारी, अधिकारी ,कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ, कृषी मित्र हे सदर मोहिमेदरम्यान शेतकऱ्यांना प्रत्यक्ष बांधावर जाऊन मार्गदर्शन करीत आहेत .या मोहिमेअंतर्गत मौजे अवसरी येथे दिनांक २८ जून २०२२ रोजी खत बचत दिन साजरा करण्यात आला. यावेळी जमीन आरोग्य पत्रिकेनुसार खतांचा संतुलित वापर ,मृद व पाणी तपासणी यांचे महत्त्व, सूक्ष्म मूलद्रव्यांचे महत्त्व, आणि खतांच्या अतिवापरामुळे होणारे दुष्परिणाम तसेच सुपर केन नर्सरी व एकरी 100 टन ऊस उत्पादन तंत्रज्ञान याविषयी कृषी पर्यवेक्षक श्री के .बी. पांढरे यांनी मार्गदर्शन केले. जैविक बीजप्रक्रिया करून पेरणी केल्याने व पाचट व्यवस्थापन पद्धतींचा अवलंब केल्याने खतामध्ये बचत होते. त्यामुळे बीजप्रक्रिया करूनच पेरणी करण्याचे आवाहन कृषी विभाग शेतकऱ्यांना करीत आहे. यावेळी कृषी विभागाच्या विविध योजना, मग्रारोहयो फळबाग लागवड योजना, महाडिबिटी योजना, प्रधानमंत्री सूक्ष्म प्रक्रिया उद्योग तसेच गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना याविषयी कृषी सहाय्यक अनुपमा देवकर यांनी मार्गदर्शन केले.या कार्यक्रमासाठी अवसरी तील शेतकऱ्यांनीही उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत उपस्थिती दर्शवली यावेळी अवसरी गावातील समाधान मोरे (ग्रामपंचायत सदस्य) ,डॉ. नागनाथ शिंदे ,अंगद तावरे शांतीलाल सावंत, अनिल घनवट, योगेश पवार( प्रगतशील बागायतदार), निवृत्ती मगर बाळासाहेब कांबळे नितीन कांबळे आदी, शेतकरीवर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
Home Uncategorized महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत अवसरी मध्ये कृषी संजीवनी मोहीम कार्यक्रम संपन्न.