महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षामध्ये अवसरीतील युवकांच्या शिरपेचात मानाचा तुरा मिळाला आहे. इंदापूर येथे महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचा नवीन पदाधिकाऱ्यांची निवड नुकतीच झाली त्यामध्ये अवसरीतील संतोष वसंत वाघमारे यांची इंदापूर तालुका युवक उपाध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. तसेच दीपक महादेव कांबळे यांची वाहतूक सेना पुणे जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. व अमोल भागवत कांबळे यांची इंदापूर तालुका युवक सरचिटणीस पदी निवड करण्यात आली .त्यामुळे अवसरी मध्ये व पंचक्रोशीत जोश पूर्वक आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे .इंदापूर मध्ये महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचा नवीन पदाधिकाऱ्यांची निवड व पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम मोठ्या जल्लोषात महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष मा. संजय भैय्या सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी महिला आघाडीचे नेत्या मा. विद्याताई सोनवणे व इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष मा. संजय भैय्या सोनवणे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. अवसरीतील संतोष वाघमारे , दीपक कांबळे, अमोल कांबळे यांनी जनता एक्सप्रेस मराठी न्यूजशी बोलताना सांगितले की, ग्रामीण भागामध्ये तळागाळातील प्रत्येक अपेक्षित घटकापर्यंत पक्षाचे विचार ,ध्येय धोरणे पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करणार आहोत .पक्ष व पक्षश्रेष्ठींनी दिलेल्या निर्देशाचे पालन करून शिस्तीचा आदर्श जोपासण्याचा प्रयत्न करणार आहोत .तसेच पीडित व अन्यायग्रस्त जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून त्यांना सहकार्य करणार आहोत. व पक्ष वाढवण्याचेही काम जोरदारपणे चालू करणार आहोत. अशी माहिती त्यांनी दिली. या कार्यक्रमासाठी इंदापूर तालुक्यातील बहुसंख्य लोक उपस्थित होते .महाराष्ट्र रिपब्लिक पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष मा. विकास भोसले ,युवा सेना मा. युवराज रेडके, इंदापूर तालुका अध्यक्ष मा. अंगद गायकवाड , तालुका उपाध्यक्ष आदिनाथ मोरे, इत्यादी पदाधिकारी ही उपस्थित होते .तसेच अवसरीतील मेजर सुरज कांबळे, भैय्या साहेब कांबळे, सुनिल गायकवाड, पप्पू खरे, नितीन वाघमारे, रंजित कांबळे, संतोष कांबळे, अभिषेक कांबळे,हनुमंत कांबळे, आदी युवक उपस्थित होते,