महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या प्रदेश महासचिवपदी विजयसिंह चौधरी यांची निवड

मुंबई (प्रतिनिधी विशाल रणवरे) -महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या अंतर्गत निवडणूका नुकत्याच पार पडल्या. या निवडणुकांचे निकाल काल जाहीर झाले असून इंदापूरचे युवा नेते ऍड. विजयसिंह मनोहर चौधरी यांची महासचिवपदी निवड झाली आहे.
विजयसिंह चौधरी विद्यार्थी चळवळीतले आक्रमक नेतृत्व म्हणून महाराष्ट्रात ओळखले जातात.वयाच्या १६ व्या वर्षांपासून काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून काम करताना त्यांनी आपल्या राजकीय कामाची सुरुवात एन एस यु आय मधून केली. कॉलेज सेक्रेटरी, २००९ साली कॉलेज अध्यक्ष NSUI, २०१२-२०१४ पुणे शहर व पुणे जिल्हाध्यक्ष NSUI, २०१४-२०१६ साली महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष NSUI , तसेच २०२०-२१ साली महासचिव युथ काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश अशा विविध पदांची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे.वकिलीच्या क्षेत्रात मोठी कौटुंबिक पार्श्वभूमी असतानाही त्यांनी वकिली न करता काँग्रेस पक्षाच्या संघटनेसाठी पूर्णवेळ काम करण्याचा निर्णय घेतला.
विदयार्थीदशेत असल्यापासूनच युवकांचं संघटन करण्यास सुरुवात केली. यातूनच नुकत्याच पार पडलेल्या युवक काँग्रेसच्या निवडणुकांमध्ये उमेदवारी करत प्रदेश महासचिव पदी ते निवडून आले आहेत.विद्यार्थी चळवळीतून पुढे आलेला सामान्य कुटुंबातील एक कार्यकर्ता महत्वाच्या पदावर नियुक्त झाल्याने कार्यकर्त्यांमध्येही एक सकारात्मक संदेश गेला आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here