महाराष्ट्रावर ओमायक्रॉन’चे संकट गडद..! पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये 7 रुग्ण आढळले..

पुणे (प्रतिनिधी: रविंद्र शिंदे) महाराष्ट्रावरील ओमायक्रान’चे संकट आणखी गडद अर होताना दिसत आहे..डोंबिवलीतील तरुणाला “ओमायक्रान’ची बाधा झाल्याचे शनिवारी (4 डिसेंबर) समोर आले होते. त्यानंतर आज आणखी 7 रुग्णांची त्यात भर पडली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.. विशेष म्हणजे, एकट्या पिंपरी चिंचवडमध्ये “ओमायक्रान’चे 6, तर पुण्यात 1रुण आढळला आहे.त्यामुळे महाराष्ट्रातील ‘ओमायक्रान’व्हेरियंटच्या रुग्णांची संख्या आता 8 वर गेली आहे.
भावंडांची भेट महागात पडली
नायजेरियातील लेगास शहरातून आपल्या भावाला भेटण्यासाठी 44 वर्षीय महिला 24 नोव्हेंबर रोजी पिंपरी चिंचवडला आली होती.तिच्यासोबत आलेल्या तिच्या दोन मुली, पिंपरी चिंचवडमध्ये राहणारा तिचा भाऊ आणि त्याच्या दोन मुली,अशा एकूण 6 जणांना ‘ओमायक्रान’ विषाणूची लागण झाली आहे.
नायजेरियाची नागरिक असणारी भारतीय वंशाची महिला तिच्या 12 व 18 वर्षाच्या मुलींसह भावाला भेटण्यासाठी पिंपरी चिंचवडला आली होती.चाचणीत या तिघींनाही ‘ओमायक्रान’ची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले होते.
दरम्यान, नंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या 13 निकटवर्तीयांची चाचणी केली असता, त्यात महिलेचा भाऊ, त्याची दीड व 7 वर्षांच्या मुलीलाही “ओमायक्रान’ची लागण झाल्याचे समोर आले. या सर्वांवर जिजामाता हास्पिटलमध्ये उपचार सुरू असून, सगळ्यांची प्रकृती स्थिंर आहे.
पुण्यात एक रुग्ण
दरम्यान, पुणे शहरात आढळलेल्या 47 वर्षीय रुग्ण 18 ते 25 नोव्हेंबर दरम्यान फिनलॅड येथे गेला होता. 29 तारखेला त्याला ताप आला.चाचणीत त्यालाही या नवीन व्हेरिएटचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झालेय.त्याने कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेले असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली.
मुंबई,पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर अति जोखमीच्या देशांमधून आज (5 डिसेंबर) सकाळपर्यंत 4901 प्रवासी दाखल झाले आहेत, तर इतर देशांमधून 23320 प्रवासी आले आहेत.
दिल्लीतही आढळला रुग्ण
नवी दिल्लीमध्येही आज “ओमायक्रान*बाधित पहिला रुग्ण आढळून आला. टांझानिया येथून हा रुग्ण आला होता. चाचणीत त्याला “ओमायक्रान’ची लागण झाल्याचं समोर आले. उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलंय..
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here