इंदापूर || छत्रपती संभाजीराजेंना काल रात्री आईतुळजाभवानीच्या दर्शनासाठी आले असता त्यांना नियम सांगुन रोखले गेले आणि या बाबतीत आता महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. समाजातील अनेक घटकांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. याच बाबतीत इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मयूरसिंह पाटील यांनीही नाराजी व्यक्त केली आहे.त्यांनी नाराजी व्यक्त करताना असे म्हटले आहे की,”हे राज्य सरकार विनाकारण छत्रपती घराण्याचा अपमान करत आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आई तुळजाभवानी ची शपथ घेऊन हे स्वराज्य स्थापन केलं त्यांच्या वारसांना आज दर्शन घेऊन दिले जात नाही हे महाराष्ट्रासाठी खेदजनक आहे .लोकशाहीमध्ये नियम सर्वांना समान असतो हे मान्यच आहे .इंग्लंडमध्ये शेकडो वर्षापासून लोकशाही अस्तित्वात आहे तिथली राजेशाही संपून शेकडो वर्षे झाली परंतु आजही तिथल्या राजघराण्याला मानाचे काही संकेत आहेत कारण या राजघराण्याने संपूर्ण जगावर अंमल ठेवला होता त्या घराण्याचा इतिहास व त्याग लक्षात घेऊन आजही त्यांना लोकशाही शाबूत ठेवूनच काही प्रोटोकॉल्स दिलेले आहेत जेणेकरून त्या घराण्याचा सन्मान राखला जाईल जर इंग्लंड सारखा आपल्यापेक्षा कितीतरी प्रगत आणि आधुनिक असलेला व सांस्कृतिक दृष्ट्या सुद्धा समृद्ध असलेला देश त्या राजघराण्याचा त्याग लक्षात ठेवून त्यांना सन्मान देत असेल तर या महाराष्ट्रामध्ये लोकशाहीचा व राज्य घटनेचा सन्मान ठेवूनच या शिवछत्रपतींच्या च्या घराण्याचा सन्मान का राखला जाऊ शकत नाही…?प्रत्येक गोष्टी मध्ये राजकीय भूमिका लक्षात घेऊन छत्रपती घराण्याचा अपमान करणे कितपत योग्य आहे..? छत्रपतींचे घराणे हे सर्व जाती धर्माला बांधण्याचे एकमेव सूत्र या महाराष्ट्र मध्ये आहे ज्या शाहू महाराजांनी समाजातल्या तळागाळातील लोकांना बरोबर घेऊन त्यांना प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केला त्याच घराण्यातील वंशजांचा अपमान हे प्रशासन करू इच्छित आहे परंतु या महाराष्ट्रातील जनता अशा पोरकट गोष्टीं कडे लक्ष न देता आपले दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वारसांना राजकीय भूमिका बाजूला ठेवून नेहमीच आदराचे स्थान देत राहतील आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आपण अबाधित राखू परंतु ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन मत मागता.. सरकार स्थापन करता.. त्यांचाच अपमान आज या महाराष्ट्राच्या धरती मध्ये होतो हे निंदनीय आहे छत्रपती घराने हे तमाम महाराष्ट्रा साठी आदरणीय आहे त्यांचा असा अपमान होणे कितपत योग्य आहे..? तिथल्या प्रशासनाचा जाहीर निषेध.. ज्यांच्या कडून ही चूक झाली आहे त्यांच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे.”अशा स्वरूपात सोशल मीडिया पोस्ट करत मयुरसिंह पाटील यांनी आपली नाराजगी व्यक्त केली आहे आता येणाऱ्या काळामध्ये याच बाबतीत काय घडामोडी घडत आहेत हे पाहण्याजोगे ठरणार आहे .