इंदापूर :भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानिमित्त अमृतमहोत्सवी राष्ट्रवंदन करून पतंजलि योगपिठ हरीद्वार यांच्या निर्देशानुसार महर्षि दयानंद सरस्वती यांची 198 जयंतीनिमीत्त पतंजलि योग सामिती इंदापूर यांच्या सर्व टीमने जिल्हा परिषद शाळा क्र-1व 2 या ठिकाणी सुरु असलेला मोफत साई वर्गामध्ये जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.याप्रसंगी सुर्यनमस्कार,योगप्राणायम व आग्नियज्ञाचे आयोजन करून अतिशय प्रसन्न,भक्तिमय वातावराणामध्ये हा कार्यक्रम घेण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ज्येष्ठ समाजसेविका सायराभाभी आतार ठरल्या कारण त्यानी स्वतःने पुढाकार घेत अग्नियज्ञात सहभागी होऊन पारंपरिक पद्धतीने हा अग्नीयज्ञ पूर्ण केला. हा अनोखा व आगळावेगळा उपक्रम राबविल्याने पतंजली योग समिती इंदापूर चे शहरात कौतुक होत होते. या कार्यक्रमाचे आयोजन पतंजली योग समिती इंदापूर सर्व सन्माननीय पदाधिकारी व साधक भीमराव वनवे, वनवे किसन , सायरा भाभी आतार, डॉ संजय शिंदे, सचिन पवार ,प्रशांत गिड्डे ,रवींद्र परबत ,शरद झोळ ,चंद्रकांत देवकर, अण्णासाहेब चोपडे ,ज्ञानदेव डोंगरे ,बाजीराव शिंदे, बिबीशन खबाले ,पियुष बोरा, निलेश शिंदे ,मल्हारी घाडगे, शंकर काशीद, शरद पवार, विक्रम पोद्दार, सुनील डोके व इतर साधक उपस्थित होते.