“मला सेनेतून काय बाहेर काढणार? मीच सेनेतून बाहेर पडलो आहे”- माजी आमदार विजय शिवतारे.

कालच माजी आमदार विजय शिवतारे यांनी पक्षविरोधी कारवाया केल्याचा आरोप करीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती.इतकंच नाही तर शिवतारे यांचे शिवसेना सदस्यत्व देखील रद्द केल्याची माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून देण्यात होती.या कारवाईला उत्तर देताना विजयबापू शिवतारे यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.राऊतांना स्किझोफ्रेनिया नावाचा आजार, कधीही कुठलेही भास होतात अशी टीका शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी राऊतांवर केली आहे. 29 तारखेला पत्रकार परिषद घेऊन मी माझी भूमिका मी माध्यमांच्या समोर मांडली होती. त्यामुळे हे मला सेनेतून काय बाहेर काढणार मीच सेनेतून बाहेर पडलो आहे. महाविकास आघाडी आम्हाला मान्य नाही. आम्ही सगळे शिवसेनेतच आहोत. संजय राऊतांनीच हे सगळं घडवून आणले आहे. आता महाराष्ट्रात सर्वाना माहीत आहे की संजय राऊतांची भक्ती किंवा निष्ठा कुणावर आहे असेही शिवतारे म्हणाले आहेत. संजय राऊत यांची कुणावर किती निष्ठा आहे हे आम्हाला चांगलंच माहित आहे अशा शब्दात विजय शिवतारे यांनी संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडले.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here