इंदापुर: दर वर्षी 28 नोव्हेंबर रोजी आपण महात्मा फुले स्मृतिदिन साजरा करतो या वर्षी देखील मराठा सेवा संघ व जिजाऊ ब्रिगेड यांनी महात्मा फुले स्मृतिदिन व शिक्षक दिन उत्साहात मध्ये इंदापूर येथे साजरा केला.
शिवश्री गणेश रणदिवे सरांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगून व जिजाऊ वंदना गाऊन कार्यक्रमाची सुरुवात केली.
महात्मा फुले यांचे शिक्षणाबद्दल उल्लेखनीय कार्य असल्यामुळे मराठा सेवा संघाच्या वतीने या दिवशी शिक्षक दिन साजरा केला जातो. त्यानिमित्त आज शैक्षणिक क्षेत्रामध्ये विशेष काम करणाऱ्या विविध शिक्षकांचा गौरव करण्यात आला.
मराठा सेवा संघ व जिजाऊ ब्रिगेड तर्फे या शिक्षकांचा गौरव करण्यात आला.
१. शिवश्री विजयकुमार फलफले सर
२. शिवश्री विजय नवल सर
३. शिवमती सुनिता गलांडे मॅडम
४. शिवश्री राम घोगरे सर
५. शिवश्री महेश घोगरे सर
सन्मानाचे स्वरूप महात्मा ज्योतिबा फुले यांची प्रतिमा महात्मा फुले यांचे चरित्र पुस्तक व सन्मानपत्र असे होते.
त्या वेळी सर्वच सत्कार मूर्ती यांनी आपले मनोगत व्यक्त केले व मराठा सेवा संघ व जिजाऊ ब्रिगेडच्या या उपक्रमाचे स्वागत केले. *सामाजिक कार्यासाठी मराठा सेवा संघ व जिजाऊ ब्रिगेड ला मदत करण्यासाठी सदैव तत्पर असल्याची ग्वाही दिली.* व शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपण करत असतात असताना आपले अनुभव सांगितले
यावेळी जिजाऊ ब्रिगेड पुणे जिल्हा अध्यक्ष शिवमती जयश्रीताई गटकुळ मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले व शैक्षणिक क्षेत्रामध्ये महात्मा ज्योतिबा फुले व सावित्री बाई फुले यांच्या कार्याची माहिती सांगितली.
शिवश्री भास्कर गटकुळ सर व व मराठा सेवा संघ तालुका अध्यक्ष शिवश्री राहुल घोगरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
शैक्षणिक क्षेत्रामध्ये करत असलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल यावेळी मराठा सेवा संघातर्फे शिवश्री भास्कर गटकुळ सर व शिवमती जयश्रीताई गटकुळ मॅडम यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
आभार प्रदर्शन मराठा सेवा संघ इंदापूर तालुकाध्य शिवश्री राहुल घोगरे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवमती जयश्रीताई खबाले, मराठा सेवा संघ कोषाध्यक्ष शिवश्री प्रमोद जगताप, प्रसिद्धी प्रमुख शिवश्री सागर जाधव यांनी प्रयत्न केले