*मराठा सेवा संघ इंदापूर व जिजाऊ ब्रिगेड पुणे यांच्या वतीने जिजाऊ जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा*
मराठा सेवा संघ इंदापूर व जिजाऊ ब्रिगेड पुणे यांच्या वतीने जिजाऊ जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा केला.
जिजाऊ जन्मोत्सवाची सुरुवात सामुहिक जिजाऊ वंदना गायनाने करण्यात आली व जिजाऊ माँसाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करुन करण्यात आले.
मराठा सेवा संघ व जिजाऊ ब्रिगेड यांच्या वतीने जिजाऊ जयंती निमित्त विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या, व्यक्तींना घडवणाऱ्या माता-भगिनींचा चा सन्मान करण्यात येतो.
इंदापूर तालुक्यातून शिवमान हर्षल भगवान घोगरे हे यूपीएससी परीक्षा पास झालेले एकमेव विद्यार्थी आहेत. ज्याप्रमाणे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवले, शिवमान हर्षल भगवान घोगरे यांना योग्य शिक्षण व मार्गदर्शन करून घडवणाऱ्या त्यांच्या मातोश्री शिवमती सुनिता भगवान घोगरे यांना २०२२ चा जिजाऊ गौरव पुरस्कार सन्मानचिन्ह,सन्मान पत्रक, शाल, श्रीफळ आणि साडी चोळी देऊन गौरवण्यात आले.
इंदापूर मराठा सेवा संघाचे अध्यक्ष शिवश्री राहुल घोगरे यांनी प्रास्ताविक केले. हर्षल च्या वडिलांनी लहानपणी हर्षलला वाचनाची खूप आवड होती, तो पेपर वाचण्या साठी खुप धडपड करत असे, अगदी जेवणाच्या सुट्टीत देखील पेपर वाचत असे. मी त्याला खूप पुस्तके आणून देत असत, हर्षल लहानपणापासून खूप कष्टाळू आणि जिद्दी होता. हर्षल भावी आयुष्यात उत्कृष्ट कार्य करून आमच्या घराण्याचा आणि इंदापूरचा नावलौकिक करेल.भावी आयुष्यात गोर गरीब लोकांसाठी खूप चांगलं आणि प्रामाणिकपणे काम करेल असे मत व्यक्त करताना शिक्षणाचा बावडा ते दिल्ली प्रवास कसा केला हे सांगताना ते अत्यंत भावनिक होऊन भावनिक झाले. सौ. सुनिताताई घोगरे यांनी आपल्या मुलाबद्दल लहानपणीच्या अनेक आठवणी सांगत ‘मी त्याला शिक्षणासाठी पुण्यात ठेवून परत येताना खुप रडले आणि आज त्याने शिक्षण घेऊन नेत्रदिपक यश मिळवले तेव्हा खुप आनंद झाला माझ्या मुलाने समाजासाठी खुप मोठे कार्य करावे’ अशी अपेक्षा व्यक्त केली. जिजाऊ ब्रिगेड पुणे जिल्हा अध्यक्ष डॉ.जयश्री गटकुळ यांनी *हर्षल यांचे विचार कर्तुत्व आणि ज्ञानाची उंची हिमालयाइतकी आहे त्यांचे खरे विद्यापीठ त्यांच्या आई आहेत* असे मत व्यक्त केले, आभार प्रदर्शन प्रमोद जगताप यांनी व्यक्त केले, जिजाऊ ब्रिगेड इंदापूर तालुका च्या अध्यक्षा श्रीमती राधिका शेळके यांच्या हस्ते पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवश्री गणेश रणदिवे यांनी केले कार्यक्रमाला डॉ.भास्कर गटकुळ प्रा. राजश्री जगताप, राधिका शेळके, सुरेखा घोगरे, सुवर्णा घोगरे, महेश कोरटकर, प्रमोद देशमुख, प्रमोद जगताप, तुषार घोगरे, निवास शेळके अन्य मान्यवर उपस्थित होते.आभार प्रदर्शन मराठा सेवा संघाचे कोषाध्यक्ष शिवश्री प्रमोद जगताप यांनी केले.
मराठा सेवा संघ इंदापूर तालुका कार्याध्यक्ष शिवश्री महेश कोरटकर, मराठा सेवा संघ इंदापूर शहर उपाध्यक्ष शिवश्री प्रमोद देशमुख, शिवश्री तुषार घोगरे, जिजाऊ ब्रिगेडच्या तालुका अध्यक्षा शिवमती राधिकाताई शेळके, जिजाऊ ब्रिगेड पुणे जिल्हा सचिव शिवमती विश्वबाला गटकुळ व जिजाऊ इन्स्टिट्यूटच्या प्राचार्या राजश्री जगताप यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.