आज मराठा सेवा संघाच्या इंदापूर तालुक्याच्या कमिटीकडून नायब तहसीलदार अनिल ठोंबरे यांना एक निवेदन दिले आहे यामध्ये मराठा सेवा संघ इंदापूर तालुका यांच्याकडून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी,भाजपाचे सुधांशू त्रिवेदी, व इतिहासाची मोडतोड करणाऱ्या चित्रपट निर्मात्यांचा निषेध करण्यात आला.मराठा सेवा संघाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनामध्ये असे नमूद केले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज हे संपुर्ण जगाचे आराध्ये दैवत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, जिजाऊसाहेब, व इतर सर्व महापुरूष हे आमचे प्रेरणा व अस्मिता आहेत. परंतु मागील काही दिवसापासुन महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, भाजपचे नेते सुधांशु त्रिवेदी व इतर राजकिय नेते जाणून बुजून महापुरूषांची बदनामी करत आहेत.तसेच छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या मावळ्यांच्या शौर्यावर प्रकाश टाकणारे चित्रपट येत आहेत.परंतु हे दाखवत असताना कोणत्याही प्रकारचे ऐतिहासिक संदर्भ यांचा अभ्यास न करता चित्रपट बनवत आहेत, त्यामुळे मूळ इतिहास बाजूला सारून त्याची मोडतोड करून, निर्माते -दिग्दर्शक यांना वाटेल तसे चित्रपट निर्मिती करीत आहेत. हे सर्व सिनेमॅटिक लिबर्टी च्या नावाखाली सुरू आहे. त्यामुळे महाराष्ट्रतील वातावरण बिघडत आहे. हे सर्व प्रकार म्हणजे अप्रत्यक्षपणे महापुरूषांची बदनामी करणे होय, तरी आम्ही आपणांस विनंती अर्ज करीत आहोत की भविष्यातील सर्व अनुचित प्रकार थांबवावे व आम्ही सदर प्रकारचा निषेध करीत आहोत. अशा आशयाचे निवेदन या कमिटीने नायब तहसीलदार अनिल ठोंबरे यांना दिले आहे.या निवेदनात मराठा सेवा संघ तालुकाध्यक्ष राहुल घोगरे,मराठा सेवा संघ शहराध्यक्ष राहुल गुंडेकर,सामाजिक कार्यकर्ते निवास शेळखे,प्रतीक झोळ, राजन पवार, सागर जाधव, विजय आवटे, योगेश कुठे अजिंक्य बंगळे, निखिल कारंडे इत्यादी शिवप्रेमीं उपस्थित होते.
Home Uncategorized मराठा सेवा संघ इंदापूर तालुका यांच्याकडून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी,भाजपाचे सुधांशू त्रिवेदी व...