पालघर: (वैभव पाटील :प्रतिनिधी 9850868663)पंढरपूर येथील वाखरी येथे रविवारी दि. 26 फेब्रुवारी रोजी मराठा बिजनेस असोसिएशन आयोजित राज्यस्तरीय मराठा व्यवसाय सोहळा आणि मराठा उत्पादकांचे वस्तू प्रदर्शन व विक्री आणि प्रसार याविषयी माहिती देण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमाला सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहावे.या कार्यक्रमांमध्ये मराठा समाजाच्या व्यवसायाकांनी आपले व्यवसायाचे उत्पादनाचे वस्तू प्रदर्शन व विक्री आणि व्यवसायकाचा प्रसार याबाबत माहिती दिली जाणार आहे.त्याचबरोबर या कार्यक्रमांमध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ व्याज परतावा योजना याची माहिती योगेश वाघ समन्वयक सोलापूर जिल्हा हे करणार आहे.त्याचबरोबर यशाची चावी कॉर्पोरेटर ट्रेनर व चीफ मॅनेजर वोक्सवॅगन कंपनीचे अविनाश घोगरधरे हे करणार आहेत.अध्यात्मकतेची उद्योजकांसाठी गरज याविषयी ह.भ.प. बालाजी महाराज बोराडे समाज प्रबोधनकार व शिवव्याख्याते हे करणार आहेत.पंढरपूरचे उद्योजक अभिजीत पाटील हे उद्योजकता एक सहज आव्हान याविषयी मार्गदर्शन करणार आहेत.या राज्यस्तरीय मराठा व्यावसायिक सोहळा कार्यक्रमासाठी विपुल लावंड, गणेश माने, भारत काकडे, रविंद्र माने,अनंता नाईकनवरे, दत्ता भुसे, रोहन बारकुंड व सर्व एम बी ए सोलापुर टीम यांनी या कार्यक्रमासाठी सर्व उद्योजक व व्यावसायिक मराठा समाज बांधवांना आमंत्रित केले आहे. तरी या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात उपस्थित रहावे.कार्यक्रम स्थळ सद्गुरु मंगल कार्यालय वाखरी, ता.पंढरपूर, रविवार दिनांक 26 फेब्रुवारी सकाळी दहा वाजता.