मयत शिक्षक कुटुंबांना 31 लाखाची मदत करणारी इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्था ही राज्यातील आदर्शवत पतसंस्था- आ. दत्तामामा भरणे

पेन्शन धारक शिक्षक वृत्त पावल्यास कुटुंबास 20 लाख रुपये तर डीसीपीएस धारक शिक्षक मृत पावल्यास कुटुंबास 31 लाख रुपये देणारी इंदापूर प्राथमिक शिक्षक पतसंस्था ही महाराष्ट्रातील एकमेव पतसंस्था ठरली आहे असे मत आदिनाथ धायगुडे यांनी व्यक्त केले.आज इंदापूर प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचा 99 वार्षिक सर्वसाधारण सभा कर्मयोगी शंकरराव पाटील सभागृहात संपन्न झाली. सभेच्या वेळी अनेक महत्त्वाचे निर्णय एकमताने घेण्यात आले यामध्ये सभासदाची कर्ज मर्यादा 20 लाखांवरून 30 लाख रुपये करण्यात आली. व या ऐतिहासिक निर्णयाचे सर्व सभासदांनी टाळ्या वाजवून स्वागत केले. त्याचप्रमाणे तातडीचे कर्ज योजनेत 50 हजार रुपये मर्यादेवरून 75 हजार रुपये पर्यंत मर्यादा वाढवली असून याही निर्णयाचे स्वागत सभासदांनी टाळ्या वाजवून केले. या सर्वसाधारण सभेमध्ये गेल्या आर्थिक वर्षात झालेल्या कामकाजाचा लाभांश सहा टक्के देण्याचा निर्णय संचालक मंडळाने केला. त्याचप्रमाणे मागील संचालक मंडळाने केलेली आर्थिक उधळपट्टी व बोगस बिलांची चौकशी लावणार असल्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. यावेळी आलेल्या प्रत्येक सभासदांना भत्ता रुपये 709 देण्यात आला.यावर्षी च्या सभेला एक ऐतिहासिक गर्दी होती व संचालक मंडळ काही विरोधकांनी विरोध जरी केला असला तरी सर्व विषयी मार्गी लागले असल्याचे संचालक मंडळाकडून सांगण्यात आले. व्यापारी संकुलास कोणत्याही राजकीय व्यक्तीचे नाव देण्यापेक्षा महामानवांचे नाव देऊन जागतिक संदेश दिला आहे असे संचालक मंडळाचे मत आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष दत्तात्रय मामा भरणे होते व दत्तात्रय भरणे यांची शिक्षकांनी घोड्यावर बसून मिरवणूक काढली त्याचप्रमाणे सुमारे 7 वर्ष प्राथमिक शिक्षक भरणे मामांना वार्षिक सर्वसाधारण सभेस बोलवा अशी मागणी करत होते व ही मागणी आज पूर्वत्वास आली. यावेळी दत्तामामा भरणे म्हणाले की,ज्या शिक्षकांना पेन्शन नाही अशा शिक्षकांचे सेवेत असताना मयत झाले तर त्यांच्या कुटुंबियांना ३१ लाखाची मदत करणारी राज्यातील प्रथम शिक्षक संस्था इंदापूरची याचा अभिमान वाटतो त्याचप्रमाणे प्राथमिक शिक्षक मुख्यालय राहावे असा शासन निर्णय आहे हा शासन निर्णय फार जुना आहे ज्या काळात दळणवळणाची साधने उपलब्ध नव्हती त्या काळात शिक्षकांनी मुख्यालय राहावे असे शासनाचे धोरण होते परंतु बदलत्या काळानुसार यामध्ये शितलता येत गेली दळणवळणाची साधने वाढली असल्याने मुख्यालय राहण्यावरच गुणवत्ता सुधारते हा मुद्दा कालबाह्य झाला विनाकारण शिक्षकांना वेटीस धरण्यासाठी हा शासन निर्णयाचा वापर राजकीय आणि इतर क्षेत्रातील मंडळी करतात हे चुकीचे असून मुख्यालय राहण्याचा निर्णय रद्द करण्यासाठी मी शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी यावेळी सांगितले.यावेळी जिल्हा आदर्श शिक्षक ,शिष्यवृत्ती गुणवत्ता धारक ,नवोदय पात्र, सैनिक स्कूल पात्र , दहावी ९०%/बारावी ८५% च्या पुढील , नीट आणि जेईईमध्ये चमकलेले प्राथमिक शिक्षकांची मुले , संस्थांचे राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षक , सेवानिवृत्त शिक्षक यांचा सत्कार करून गुणगौरव करण्यात आला.या कार्यक्रमात माजी राज्यमंत्री व इंदापूरचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांच्या शुभहस्ते शिवाजी लाळगे लिखित आठवणींच्या हिंदोळ्यावर या पुस्तकाचे प्रकाशन झाले.शिवाजी लाळगे हे इंदापूर तालुक्यातील बोरी गावचे असून सध्या ते काझड प्राथमिक शाळेमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.शिवाजी लाळगे यांनी लिहीलेले आठवणींच्या हिंदोळ्यावर हे पुस्तक जुन्या काळातील प्रसंगावर आधारीत पुस्तक आहे.जुन्या काळातील पडद्यावरील पिक्चर,लग्न सोहळा,जागरण,शाळा अशा विविध विषयांवर लेखन या पुस्तकात केले आहे.पुस्तक वाचताना प्रत्येक व्यक्तीचे बालपण डोळ्यासमोर आल्याशिवाय रहाणार नाही असे मत लेखक शिवाजी लाळगे यांनी यावेळी व्यक्त केले.यावेळी बोरी गावातून गोविंद वाघमोडे,ज्ञानेश्वर जोरी,सचिन देवडे, रामचंद्र जोरी,हनुमंत धायगुडे,ज्ञानदेव ठोंबरे,बबन ठोंबरे,पांडुरंग सामसे,हरिदास सामसे,मार्तंड डफळ हे आवर्जून उपस्थित होते.हे पुस्तक खरेदी करण्यासाठी लाळगे सरांचा गुगल पे नंबर 9422211602 यावर पैसे पाठवण्याची व्यवस्था केली असून याद्वारे पुस्तक बुकिंग होणार आहे.आठवणीच्या हिंदोळ्यावर हे पुस्तक प्रकाशन झाल्यानंतर लेखक शिवाजीराव लाळगे यांनी हे पुस्तक रुपये 150 च्या ऐवजी 100 रुपयांमध्ये विक्रीस उपलब्ध केले आहे.  प्रदिप गारटकर यांनी मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमास हनुमंत कोकाटे ,गौतम कांबळे, बाळासाहेब काळे, सचिन सपकळ ,ह.मा.पाटील, शुभम निंबाळकर ,दत्तात्रय तोरसकर, नानासाहेब नरूटे ,सुहास मोरे,सहदेव शिंदे,सतीश शिंदे, अनिल रुपनवर,नानासाहेब दराडे उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here