इंदापूर तालुक्यामधील सर्व महाविद्यालयापैकी गुणवत्ता टिकवून ठेवणाऱ्या तसेच शैक्षणिक दर्जा व त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारे तालुका ग्रामविकास प्रतिष्ठाण चे विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळंब येथे वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते याचे उदघाटन इंदापूर तालुक्याचे आमदार माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.यावेळी आमदार भरणे म्हणाले की,विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांचे सादरीकरण करण्याचे हक्काचं व्यासपीठ म्हणजे वार्षिक स्नेहसंमेलन. यामधून विद्यार्थ्यांना आपल्या गायन ,नृत्य, नाटक,संगीत,अशा अनेक विविध कलागुणांना सादर करण्यास वाव मिळतो.मनोरंजनातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास होतो. यावेळी विश्वासराव रणसिंग महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने उपस्थित राहण्याचा योग आला तसेच यामुळे जुन्या आठवणींना भाषणात आमदार भरणे यांनी कॉलेज जीवनातील काही निवडक क्षणांना उजाळा देत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांमधील असलेल्या कलागुणांचे सादरीकरण पहाण्याचा आनंद घेतला. विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच खेळ आणि विविध कलामध्ये प्राविण्य मिळवले पाहिजे. याप्रसंगी आमदार भरणे यांनी महाविद्यालयाच्या भौतिक सोईसुविधासांठी २५ लाख रुपयांचा निधी जाहीर करण्यात आला.
यावेळी महाविद्यालयाच्या अध्यक्षा श्रीमती आनंदी विश्वासराव रणसिंग, सचिव विरसिंहभैय्या रणसिंग, प्राचार्य डॉ अंकुशराव आहेर,छत्रपती कारखान्याचे संचालक अभिजित रणवरे युवा उद्योजक विनोद रणसिंग सचिन सपकळ,सुहास डोंबाळे,रामभाऊ कदम,मधुकर पाटील,अतुल सावंत,शुभम निंबाळकर,रामभाऊ रणसिंग,जितेंद्र रणवरे,योगेश डोंबाळे पिंटू डोंबाळे आदी मान्यवर व विद्यार्थी उपस्थित होते.