राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल पुणे जिल्हा आणि मैत्री फौंडेशन च्या वतीने मनोज गुंजाळ यांचा सत्कार संपन्न.मनोज गुंजाळ यांना राष्ट्रीय सेवा योजना २०१९ -२० चा केंद्र शासनाचा राष्ट्रीय उत्कृष्ट स्वयंसेवक (राष्ट्रपती पुरस्कार)पुरस्कार जाहीर .
खेड :मनोज गुंजाळ यांचा राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल पुणे जिल्हा आणि मैत्री फौंडेशन च्या वतीने अभिनंदन करून सत्कार मुई गाव फलके वस्ती ता. खेड ,जि. पुणे येथे करण्यात आला.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानदेव शिंदे म्हणाले की,राष्ट्रीय सेवा योजना २०१९ -२० चा केंद्र शासनाचा राष्ट्रीय बेस्ट स्वयंसेवक पुरस्कार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्नित प्रा. रामकृष्ण मोरे कॉलेज आकुर्डी महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना चे स्वयंसेवक आमचे जिवलग मित्र लहान भाऊ मनोज गुंजाळ यांना जाहिर झाला त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यास विशेष शुभेच्छा असे मत व्यक्त केले.
यावेळी या कार्यक्रमाला चंद्रशेखर परंडवाल उपाध्यक्ष पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल.पुणे जिल्हा प्रमुख संघटक संजय जकाते.पुणे जिल्हा खजिनदार राजेद्र गोरे.पुणे जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानदेव शिंदे.खेड तालुका सरचिटणीस. लक्ष्मण सुडे.खेड तालुका संघटक शैलेश जाधव. खेड तालुका उपाध्यक्ष. भानुदास आल्हाट आणि डी वाय पाटील कॉलेज च्या प्राध्यापक सौ वैशालीताई सिनलकर, बंधू मयुर गुंजाळ , सौ दीपाली ज्ञानदेव शिंदे, सौ निताताई मयुर गुंजाळ आणि सुहास ढगे आदी मान्यवर उपस्थित होते.