मनशांती आणि उत्तम आरोग्यासाठी योग आणि ध्यान आवश्यक- पतंजली योग समितीचे दत्तात्रय अनपट सर

निरोगी आयुष्यासाठी योगासन अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. योगाचे फायदे खूप आहेत. योगामुळे शुगर, बद्धकोष्ठता यांसारख्या आजारांशी लढण्यासही मदत होते. मनःशांती आणि उत्तम आरोग्यासाठी योग आणि ध्यान आवश्यक मानले जाते. आता योग हा फक्त शहरी भागातच केला जातो असे नाही तर पतंजली योग परिवार इंदापूर यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातही योग शिबिरे घेऊन लोकांना योगाचे महत्त्व देत जनजागृती केली जात आहे.नुकतेच इंदापूर तालुक्यातील सुप्रसिद्ध योगगुरु दत्तात्रय अनपट सर व मदन चव्हाण सर यांच्या मार्गदर्शनाखाली शेटफळ हवेली येथील योग शिबिर चालू झाले असून या योग शिबिरास उत्तम प्रतिसाद मिळत आहे.पहाटेच्या मंद वाऱ्यात व उत्साही वातावरणात भैरवनाथ मंदिराच्या आवारात शेटफळ हवेलीतील नवयुवकांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच जण याचा फायदा घेत आहेत आणि विशेष म्हणजे हे योग शिबिर निशुल्क पद्धतीने 1 जून पर्यंत पहाटे 5 ते 7 वाजपर्यंत राबवले जाणार आहे. यावेळी दत्तात्रेय अनपट सर म्हणाले की,”अनेकदा लोकांना असे वाटते की योगा केवळ शरीर लवचिक बनवण्यासाठी केला जातो, पण तसे नाही. योगाची अनेक आसने आहेत, ज्यांचे अनेक फायदे आहेत. योगाच्या मदतीने तुम्ही आयुष्यभर तरुण आणि निरोगी राहू शकता. अनेकदा लोक योगाला संथ माध्यम मानतात, पण तसे नाही. योग तुम्हाला अनेक प्रकारे निरोगी राहण्यास मदत करू शकतो.मनशांती आणि उत्तम आरोग्यासाठी योग आणि ध्यान आवश्यक आहे असे पतंजली योग समितीचे अनपट सर म्हणाले.सध्या शेटफळ हवेली येथे राबवण्यात येत असलेल्या योगा शिबिरात योगाचे फायदे खालील प्रमाणे सांगितले जाते.
👉मन शांत राहील : योग हा स्नायूंसाठी चांगला व्यायाम आहे, परंतु वैद्यकीय संशोधनाने सिद्ध केले आहे की योग शारीरिक आणि मानसिक दोन्ही दृष्ट्या वरदान आहे. योगामुळे तणाव दूर होतो आणि चांगली झोप लागते, भूक चांगली लागते, एवढेच नाही तर पचनक्रियाही बरोबर होते.👉 शरीर आणि मनाचा व्यायाम : जिममध्ये गेलात तर शरीर निरोगी राहते, पण मनाचे काय. दुसरीकडे, जर तुम्ही योगाची मदत घेतली तर ते तुमचे शरीर तसेच मन आणि मन निरोगी करेल👉आजारांपासून मुक्ती : योगासने करूनही आजारांपासून मुक्ती मिळू शकते. योगामुळे रोगांशी लढण्याची शक्ती वाढते. योगामुळे शरीर निरोगी आणि तंदुरुस्त राहते.👉वजन नियंत्रण : योगामुळे स्नायू मजबूत होतात आणि शरीर तंदुरुस्त होते, दुसरीकडे योगाद्वारे शरिीरातील चरबीही कमी करता येते.👉रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करा : योगासने, तुम्ही तुमच्या रक्तातील साखरेची पातळी देखील नियंत्रित करू शकता. मधुमेहाच्या रुग्णांसाठी योगासन खूप फायदेशीर आहे. योगामुळे एलडीएल किंवा खराब कोलेस्ट्रॉलही कमी होते. शेटफळ हवेली येथे हे योग शिबिर चालू करण्यासाठी योगगुरु मदन चव्हाण सर (जे मूळचे शेटफळ हवेलीचेच आहेत) व ज्येष्ठ नागरिक संघ यांनी पुढाकार घेतला असून योगाचे महत्त्व पटवून देत योग शिबिरात सहभागी होण्याचे आवाहनही ज्येष्ठ नागरिक संघ शेटफळ हवेली यांनी केले आहे.एकंदरीतच गेल्या 19 वर्षापासून योगगुरु मदन चव्हाण सर व योगगुरु दत्तात्रय अनपट सर यांच्या माध्यमातून पतंजली योग समिती ही इंदापूर शहरांमध्ये व गावोगावी योग शिबिरे राबवत योगाचे महत्त्व पटवून देत आहेत.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here