इंदापूर: उद्या रविवार दिनांक 11 जून 2023 रोजी सकाळी 10 वाजता जलजीवन मिशन अंतर्गत इंदापूर तालुक्यातील मदनवाडी येथील नळ पाणीपुरवठा योजनेचा भूमिपूजन समारंभ माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या शुभहस्ते होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप दादा गारडकर असणार आहेत.तब्बल 19 कोटी रुपयाची ही न पाणीपुरवठा योजना असल्याचे समजते. यापूर्वीही इंदापूर तालुक्यातील अनेक नळ पाणीपुरवठा योजनांचे भूमिपूजन आमदार भरणेमामा यांनी केले असून आता प्रत्येकाच्या घरात स्वच्छ पाणी देण्याचा निर्धार आहे तसेच खासदार सुप्रिया सुळे यांच्या सहकार्यातून गोरगरीब महिलांच्या डोक्यावरचा हंडा कमी करण्याच्या दृष्टीने ही योजना फायदेशीर राहील असे अनेक वेळा भरणे मामांनी बोलून दाखवली आहे. इंदापूर तालुक्यात गावोगावी व खेडोपाडी रस्त्याचे जाळे विणल्यानंतर आता गावोगावी नळ पाणीपुरवठा योजने अंतर्गत घरोघरी नळ कनेक्शन देण्याचा निर्धार केला आहे असे आमदार भरणे यांनी सांगितले.या कार्यक्रमासाठी प्रताप आबा पाटील, सचिन सपकळ, रंगनाथ देवकाते, प्रकाश ढवळे, हनुमंत बंडगर, तुकाराम बंडगर, आबासाहेब देवकाते,नानासाहेब बंडगर,आम्रपाली बंडगर, विष्णुपंत देवकाते आदी प्रमुख उपस्थित राहणार आहेत.सदरचा कार्यक्रम हा ग्रामपंचायत मदनवाडी येथे आयोजित केला असून उद्या या होणाऱ्या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहावे आवाहन मदनवाडीच्या सरपंच अश्विनी बंडगर तसेच उपसरपंच दीपाबाई ढवळे व ग्रामविकास अधिकारी गाताडे यांनी केले आहे.
Home Uncategorized मदनवाडी नळ पाणपुरवठा योजनेचा उद्या माजी राज्यमंत्री दत्तामामा भरणे यांच्या हस्ते भूमिपूजन...