मदत व पुनर्वसन मंत्री मा.विजय वडेट्टीवार व माजी मुख्यमंत्री मा पृथ्वीराज चव्हाण यांनी कल्पवृक्ष उद्योग समूहाचे मालक मा.भाऊसाहेब ढेबे काका यांच्या घरी सदिच्छा भेट

प्रतिनिधी अभिजीत खामगळ
कराड: कल्पवृक्ष उद्योग समूहास मा विजय वडेट्टीवार यांची सदिच्छा भेट….युवा नेते मा भाऊसाहेब ढेबे यांच्या कल्पनेतून आणि अथक परिश्रमातून साकारलेल्या कल्पवृक्ष शेळी पालन व मेंढी पालन उद्योग समूहास महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मा नामदार विजय वडेट्टीवार तसेच महाराष्ट राज्याचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण बाबा यांनी सदिच्छा भेट दिली….
यावेळी भाऊसाहेब ढेबे काका यांनी आपल्या धनगर समाजाचे प्रतीक असलेले काठी ,घोंगडे देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला या अनोख्या सत्काराने मंत्री महोदय भारावून गेले या सत्काराला उत्तर देताना विजय वडेट्टीवार साहेब म्हणाले,भाऊसाहेब सारख्या एका सामान्य कुटुंबातील मुलाने कष्टाच्या जोरावर केलेली प्रगती ही वाखाणण्याजोगी आहे…आपल्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्याने निर्माण केलेले शेतकरी साम्राज्य हे आजच्या युवा पिढीला प्रेरणादायी आहे…आई वडिलांचा आशीर्वाद आणि कुटुंबाची सक्षम साथ या वर भाऊसाहेबांची वाटचाल सुरू आहे शेतकऱ्यांना आदर्श ठरेल असे विविध शेतीपूरक उपक्रम राबवण्यात भाऊसाहेब ढेबे यांचा विशेष लौकिक आहे अशा एका कर्तबगार व्यक्तीच्या घराला भेट देण्याचा योग आला हे आमचे ही नशीब आहे असे प्रतिपादन केले.महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा म्हणाले,सर्व सामान्य कुटुंबात जन्माला येऊन सुद्धा आणि अल्प शिक्षित असून ही प्रगतशील शेतकरी म्हणून सगळा समाज भाऊसाहेब यांच्या कडे पाहतो याचा आम्हाला अभिमान आहे.यावेळी भानुदास माळी साहेब यांनी ही आपले मत व्यक्त केले…त्याचबरोबर वैशाली ढेबे यांची पाचवड वस्ती गावच्या पोलीस पाटील पदी नियुक्ती झालेबद्दल त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ सुरेश जाधव मा श्री इंद्रजीत चव्हाण दादा अशोकराव पाटील पोतलेकर काका,जि, प सदस्य निवासराव थोरात,जि प सदस्य मंगल गलांडे,माजी जि प सदस्य विद्याताई थोरावडे ,वनिता देवकर ,आदर्श माता बाळू ताई ढेबे, डॉ महेंद्र भोसले, महादेव शिंदे,सरपंच बाळासाहेब जावीर सुरेश जाधव पांडुरंग देशमुख नितीन ढापरे ,सागर पाटील ,प्रल्हाद देशमुख,अक्षय देशमुख,ऋषिकेश देवकरभाऊसाहेब जाधव यांची उपस्थिती होती….

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here