मकाई कारखान्याचे चेअरमन दिग्विजय बागल यांच्या वाढदिवसानिमित्त दादाश्री फौंडेशन व मकाई सहकारी साखर कारखाना यांच्यामार्फत ठीक ठिकाणी विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्य वाटप करण्यात आले. तसेच त्यांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास 175 रक्तदात्यांनी हजेरी लावली व उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. देशावरील कोरोना चे संकट ओळखून घेता त्यांनी रक्ताची कमतरता ओळखून घेऊन दिग्विजय बागल यांनी वाढदिवसाचे निमित्त साधून रक्तदान हे पुण्याचे काम केले आहे. या कार्यक्रमासाठी बागल गटाच्या नेत्या रश्मी ( दीदी) बागल, बाजार समितीचे सभापती शिवाजी बंडगर, यश कल्याणी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष गणेश करे ,कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन बाळासाहेब पांढरे, संचालक रामभाऊ हाके ,संतोष देशमुख, बापुराव कदम, महादेव सरडे ,नंदकिशोर भोसले ,आनंद ढेरे, दादाश्री फाउंडेशनचे दत्ता काकडे ,कार्यकारी संचालक हरीश खाटमोडे, माजी संचालक मोहन गुळवे, सुनील तावडे, केडगाव चे युवा तडफदार कार्यकर्ते पैलवान श्री किशोर बोराडे, साधनाताई खरात इत्यादी मान्यवर उपस्थित होते. दिग्विजय बागल यांचा करमाळा तालुक्यामध्ये रांगडा जनसंपर्क असल्यामुळे त्यांना वाढदिवसानिमित्त भेटून व्हाट्सअप द्वारे फोन करून शुभेच्छा चा वर्षाव झाला. करमाळा तालुक्यातील केडगाव मधील तडफदार युवा कार्यकर्ते पैलवान श्री किशोर बोराडे यांनीही श्री बागल यांना भेटून फुल गुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला .असे अनेक करमाळा तालुक्यातील ज्येष्ठ नेते युवा कार्यकर्ते यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी रश्मी बागल म्हणाल्या दादाश्री फाउंडेशन आणि मकाई कारखान्याने या कोरोना च्या काळात घेतलेले रक्तदान शिबिर सामाजिक जाण देणारे आहे यासोबतच त्यांनी वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला, आपण स्वतः रक्तदान करून यामध्ये सहभाग नोंदविला आहे वाढदिवसाचे निमित्त असली तरी झालेला हा उपक्रम नक्कीच कौतुकास्पद आहे.
Home Uncategorized मकाई कारखान्याचे चेअरमन दिग्विजय( प्रिन्स) बागल यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद.