संत गाडगेबाबा यांच्या दशसूत्री फलक हा मंत्रालयातून हटवल्याने महाराष्ट्रात संपूर्ण परीट समाज यांच्या भावना दुखावलेल्या असल्याचे पाहायला मिळत आहे. कालपर्यंत महाराष्ट्राच्या कामाकोपऱ्यात या विषयी नाराजगी व्यक्त करण्यात येत आहे. पण याचे पडसाद आता ग्रामीण भागातही दिसायला लागलेले आहेत कारण आज इंदापूर मध्येही सकल परीट समाज एकत्र येऊन निषेध व्यक्त केला व या संदर्भात तहसीलदारांना निवेदनही दिले.संत गाडगेबाबा यांच्या दशसूत्रीनुसार महाविकास आघाडी सरकार काम करेल आणि या दशसूत्रीचा फलक मंत्रालयाच्या प्रवेशद्ठाराजवळ लावण्यात येईल, अशी घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात केली होती.त्यानुसार संत गाडगेबाबा यांची दशसूत्री संगमरवरी फलकात कोरण्यात आली होती. तीन वर्षापूर्वी उद्धव ठाकरे यांनी या दशसूत्रीच्या फलकाचे समारंभपूर्वक अनावरण केले होते. संत गाडगेबाबांच्या दशसूत्रीनुसार महाविकास आघाडी सरकार काम करेल, असा निर्धार त्या वेळी उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला होता. त्यानंतर दोन अडीच वर्षे मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावरील ही दशसूत्री महाविकास आघाडीतील मंत्र्यांना आणि मंत्रालयात येणाऱ्यांना प्रेरणा देत होती.
मंत्रालयामधील प्रवेशद्वारावर संत गाडगेबाबांचा फोटो असलेली दशसूत्रीशीला काढून टाकली असून राष्ट्रसंत गाडगेबाबांची दशसूत्री कोनशिला त्वरित सन्मानपूर्वक बसवण्यात यावी असे निवेदन इंदापूर तालुका परीट सेवा मंडळाने श्रीकांत पाटील तहसीलदार इंदापूर यांना निवेदन दिले आहे.इंदापूर तालुका परीट सेवा मंडळाचे तालुकाध्यक्ष हनुमंत घोडके यांच्या नेतृत्वाखाली दिलेल्या या निवेदनात सोपान काका करंडे,अरुण नाना कारंडे,नाना पाटोळे,युवराज लोढे नवनाथ भोसले, महेश वाघमारे, ज्ञानेश्वर कारंडे या लोकांच्या सह्या आहेत.
👉 दशसूत्रीत नक्की काय आहे…
भुकेलेल्यांना अन्न, तहानलेल्यांना पाणी, उघडय़ा नागडय़ांना वस्त्र, गरीब मुलामुलींना शिक्षणाकासाठी मदत, बेघरांना निवारा, आश्रय, अंध, पंगू, रोग्यांना औषधीपचार, बेकारांना रोजगार, पशुपक्षी, मुक्या प्राण्यांना अभय, गरीब तरुण तरुणींचे लग्न, दुःखी निराशांना हिंमत अशा पद्धतीने दशसूत्री मध्ये याचा उल्लेख होतो.
Home Uncategorized मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावरील संत गाडगेबाबांची दशसूत्री कोनशिला हटवल्याने इंदापूर तालुक्यातील परीट समाज नाराज,...