मंगळवेढा येथे संतप्त शेतकऱ्यांनी घातल मेलेल्या सरकारचा व शेतकरी चळवळीचं श्राद्ध -राजकुमार स्वामी.

मंगळवेढा:आज शेतकरी कष्ट करतो म्हणून देश चालतो. कोरोना काळात सुध्दा सगळं बंद होतं पण शेती सुरू होती. पण त्याच्या कष्टाच मोल राहिले नाही. आज शेतमालाला योग्य भाव नाही. दुधाला योग्य भाव नाही, सोयाबीन चे दर कोसळले, ऊसबीले अडकली आहेत, ऊसाचे गाळप सुरू झाले तरी दर जाहीर करण्यात आलेला नाही , शेतमाल सोडून बाकी सगळ्या गोष्टींचे भाव वाढत आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ती आज कोणी बोलायला तयार नाही, त्याची फरफट थांबवायला तयार नाहीत. परीणामी शेतकरी रोज मरतो आहे, आत्महत्या करतो आहे. किडा-मुंगीच्या औकादीने शेतकरी मरतो आहे पण सत्ताधार्याना जाग येत नाही.बहुतेक शेतकरी नेते सत्तेच्या मागे धावत आहेत.शेतमालाचे भाव कोसळत आहेत. त्यांचा उत्पादनाचा खर्चही निघत नाही. सगळ्या सत्ता, सगळे नेते शेतक-यांचे नाव घेवून, मतं घेवून सत्तेत येतात. सत्तेत आले की शेतक-यांना विसरून जातात. शेतक-यांनी पहायचे तरी कुणाच्या तोंडाकडे ? शेतक-यांना वाली कुणी आहे का नाही ? अशी अवस्था आहे. अपवाद वगळता सर्व शेतकरी चळवळ संपली आहे . शेतकऱ्यांच्या नावाने घसा कोरडा करणारे जेव्हा मोठे होतात तेव्हा मूग गिळून गप्प बसतात. हि शेतकरी चळवळीची जुनी शोकांतिका राहिली आहे. आता पुन्हा एकदा नव्याने जुनीच लढाई लढण्याची वेळ आली आहे. आज रात्रंदिवस काबाडकष्ट करून आम्ही शेती पिकवतोय आणि आलेल्या पिकांचा दर आम्ही ठरवु शकत नाही. आमचा शेती माल मार्केट मध्ये आला म्हटलं की कमी दरात सरकार दुसरीकडून आयात करुन उपलब्ध करून देत. ऐन वेळी निर्यात बंद करत
नेमकं सरकार च धोरण काय आहे हे लक्षात येईना?मग सरकार कोणाचं ही असूद्या.
शेतकरी टिकला तर देश टिकेल हे या कृषिप्रधान देशाला ठळक आवाजात सांगाव लागेल त्यासाठी प्रामाणिकपणे आपली लढाई आपणच लढावी लागेल. कुणीतरी दुसरा आपल्या मदतीला धावून येईल हि भोळी भाबडी आशा सोडून द्यावी लागेल. आज जर अन्याय सहन करत राहिलो तर येणारा काळ आपल्याला माफ करणार नाही. याची गंभीर जाणीव आपणं घेतली पाहिजे.
असं मत राजकुमार स्वामी यांनी व्यक्त केलं यावेळी संतोष पवार सर, सचिन साळुंखे,अमोगसिद्ध काकणकी, प्रसाद कसबे, उत्तम सरडे, राजू सावंत, सचिन गरंडे, बापु घोडके, प्रशांत पोपळकर, फैयाज मुलानी,नागु म्हमाणे, दिगंबर गरंडे, महेश तळ्ळे, सिद्धेश्वर पाटील, नवनाथ शिरसटकर, आप्पाराया काकणकी,आश्र्विनी ताई पाटील,सारिका कवचाळे, चमेली पवार, उषाताई बंडगर,आकाश मोहिते,चनवीर लंगोटे, कैलास पाटील , अमृत पवार, बाबा इनामदार, गुरुनाथ शिवशरण,बबन काळे,रवींद्र काळे, संभाजी मस्के,शिवा बनसोडे, अमोल थडगे,अमोगसिद्ध पाटील, या बरोबरच तालुक्यातील बरेच शेतकरी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here