भीमा नदीला पूर ,आर्वी बेटाचा संपर्क तुटला. विद्यार्थ्यांची जीव मुठीत धरून करावी लागते शाळेत जाण्यासाठी धडपड.

प्रतिनिधी :महेश सूर्यवंशी
देऊळगाव राजे, पुणे जिल्हा व परिसरातील धरण क्षेत्रामध्ये होत असलेल्या सततच्या संततधार पावसामुळे भीमा नदी पात्रात पुर येऊन पाणी पातळी नदी पात्र सोडून बाहेर येण्याचा मार्गावर आहे. खडकवासला धरण पूर्ण १०० % भरलेले असून त्यामधून भीमा नदीत ४७०० कुसेक्स एवढा विसर्ग चालू आहे.भीमा नदीचा दौंड मधील सध्याच्या विसर्ग ६५३०० कुसेक्स एवढा आहे. या विसर्गमुळे उजनी धरणाचा पाणी साठा १२% एवढा झाला आहे. त्यामुळे देऊळगाव राजे येथील आर्वी ल जोडणारा कोल्हापूर पद्धतीचा बंधारा पाण्याखाली गेला असून आर्वी बेटाला पाण्याचा वेढा पडून आसपास च्या गावांचा संपर्क तुटला आहे. आर्वी बेटातील नागरिकांना रोजनिशीच्या कामासाठी आणि अन्नधान्य खण्या पिण्याच्या गरजू वस्तू व शेतकऱ्यांना दूध डेअरी मध्ये घालण्या साठी तर शाळकरी विद्यार्थी यांना शाळेत जाण्यासाठी जीव मुठीत धरून स्पीडबोट ने पूरपरिस्थितील तुडुंब भरून वाहत असलेली भीमा नदी पार करावी लागत आहे.धरण क्षेत्रामध्ये पर्जन्यमान पाहता व भीमा नदीवरील सर्व धरणाची पाणीपातळी पाहता नदीला अजून भरपूर प्रमाणात पूर येण्याचे संकेत दिसून येतात. या पार्शवभूमीवर प्रशासनाने आपत्कालीन व्यवस्थापन करून ग्रामस्थांना धीर द्यावा अशी सर्व नागरिकांची अपेक्षा आहे.या पूरपरिस्थितीतील नदीपात्रात स्पीडबोट चालवण्याचे काम विशाल आंबेकर करत आहेत.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here