प्रतिनिधी: अक्षय खरात
इंदापूर: भिमशक्ती सामाजिक संघटना संस्थापक अध्यक्ष मा.ना.चंद्रकांतजी हंडोरे साहेब यांच्या आदेशाने युवराज मामा पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली शोषित,वंचित,पीडित,अन्यायग्रस्त घटकांना न्याय देण्यासाठी “गाव तिथे शाखा,घर तिथे भिमशक्ती सामाजिक संघटना” उभा करण्याचा संकल्प मा.युवराज मामा पोळ यांच्या मार्गदर्शनात इंदापूर तालुक्यामध्ये चालू आहे.पिंपरी बुद्रुक येथे मामा च्या हस्ते रेबीन कापून व जय भीम च्या घोषणा देऊन फटाक्यांच्या आतिश बाजी मध्ये शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाची रूपरेषा अशी प्रथमता भीमशक्ती संघटनेच्या शाखेचे अनावरण करण्यात आले,त्यानंतर वृक्ष रोपण करण्यात आले, समाज मंदिरामध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधला, कार्यकर्त्यांचा सत्कार समारंभ पार पडला ,कार्यकर्त्यांच्या आडी अडचणी याचं निवारण करण्यात आले. कार्यक्रमानिमित्त आपल्या भीमशक्तीच्या कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.भीमशक्ती तालुकाध्यक्ष युवराज मामा पोळ यांनी कार्यकर्त्यांची संवाद साधताना भिम शक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने इंदापूर तालुक्यामध्ये होणाऱ्या पंचायत समिती ,जिल्हा परिषद निवडणुका, व इंदापूर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये माझा फटका तुटका माझा भीमसैनिक पूर्ण ताकतीने उतरून निवडणूक लढवेल अशी घोषणा युवराज मामा पोळ यांनी केली. भीमशक्ती संघटनेच्या मार्फत शोषित वंचित अन्यायग्रस्त लोकांना चांगल्या प्रवाहामध्ये आणून त्यांच्यावर झालेल्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्याचे काम पिंपरी बुद्रुक शाखेच्या वतीने करण्यात यावे व कुणावर अन्याय होणार नाही याची दक्षता घेऊन काम करण्यात यावं तसेच गुलामाला गुलामीची जाणीव करून दिल्याशिवाय तो बंड करून उठणार नाही ते काम भीमशक्तीच्या माझ्या भीमसैनिकांनी करावे .आपण सगळ्यांना सर्व जाती-धर्माच्या लोकांना भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या प्रवाहात आणून त्यांना योग्यरीत्या मार्गदर्शन करून योग्य रस्ता दाखवणे हे भिमशक्ती सामाजिक संघटनेचे कर्तव्य आहे. भीमशक्ती सामाजिक संघटना ही एका जाती धर्माची नसून ही भीमशक्ती अठरापगड जातींची आहे व सर्व जाती धर्मांना एकत्र घेऊन पुढे जाणारी ही भिम शक्ती आहे असे सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले तसेच नूतन शाखा कार्यकारणी पिंपरी बुद्रुक च्या कार्यकर्त्यांना आवाहन करण्यात आले .या वेळी कार्यक्रमाला उपस्थित डॉ बाळासाहेब पोळ, दादासाहेब पोळ, तुकाराम मिसाळ नितीन सरोदे पत्रकार सतीश जगताप,आखतर शेख, सुनील चव्हाण, राहुल बोबडे, पांडुरंग मोहिते, दत्ता कुचेकर, कल्याण घाडगे, पिनू मिसाळ ,अक्षय जगताप, संदीप जगताप, दादा लांडगे, सुदाम मिसाळ, किरण मिसाळ, समीर सय्यद, जुनेद बागवान, किशोर बोबडे, पत्रकार अण्णा तोरणे ,पत्रकार बाळासाहेब सुतार ,संतोष घाडगे,गणेश काका वाघ, समाधान चव्हाण, चिंतामणी गायकवाड, व इतर शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
Home Uncategorized भिमशक्ती सामाजिक संघटनेचे पिंपरी येथे शाखा उद्घाटन उत्साहाच्या वातावरणात संपन्न .