भिगवण प्रतिनिधी:रोहित बागडे
भिगवण:इंदापूर तालुक्यातील भिगवण स्टेशन रस्त्यांची अक्षरशा चाळण झाली असून वाहनचालकांची वाहन चालवताना त्रेधा तिरपीठ उड़ते आहे. अनेकवेळा तर अपघात देखील झाले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने आणि लोकप्रतिनिधी यांनी लक्ष देऊन रस्ते तातडीने दुरूस्त करण्याची गरज भासत आहे. पाऊस, ऊस वाहतूक ट्रॅक्टर मुळे देखील येथील रस्ते देखील वारंवार खराब होत असतात. अनेक वर्षांपासून या रस्त्याचे काम करण्यात आले नाही.उड्डाणपूलाच्या नावाखाली वर्षानुवर्षे राखलेला रस्त्यावर खड्डेच खड्डे झालेले पाहायला दिसत आहेत.
भिगवण व भिगवण स्टेशन ला जोडणारा हा रस्ता अत्यंत खराब
असून रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले असून खडी रस्त्यावर विखुरलेली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर या मुख्य रस्त्यावर वाहतूक चालते, शालेय विद्यार्थी, व्यावसायिक,दवाखान्यात जाणारे पेशंट शिवाय सध्या कोरोनाचा प्रलय असल्याने तो ग्रामीण भागातही पोहचला आहे.
कोरोनाबाधित व्यक्तींना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करता आले पाहिजे. यासाठी रस्ते सुद्धा तितकेच महत्वाचे आहेत. वाहनचालक, कामगार शेतकरी हे सुद्धा हैराण झाले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि लोकप्रतिनिधींनी या रस्त्यांच्या दुरवस्थेकडे लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.नेत्यांनी गोड गोड बोलून आणि थापा मारून नागरिकांची दिशाभूल करू नये .स्थानिक पातळीवर नागरिकांची नाराजी वाढताना दिसत आहे.