–अंकिता पाटील यांच्या हस्ते भिगवण येथे रक्तदान शिबिराचे उद्घाटन
– भाजपा युवा मोर्चाच्या वतीने भिगवण येथे रक्तदान शिबीराचे आयोजन
राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा, पुणे जिल्हा च्या वतीने ” सेवा पंधरवडा” निमित्ताने भिगवण ता. इंदापूर येथील भिगवण महाविद्यालयात रक्तदान शिबिराचे दि. 3 ऑक्टोबर रोजी आयोजन करण्यात आले.या रक्तदान शिबिराचे उद्घाटन भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या पुणे जिल्हाध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.
भिगवण व परिसरातील युवकांनी रक्तदान शिबीरास प्रतिसाद दिला. यावेळी निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक व भाजपा युवा मोर्चा कोअर कमिटीचे प्रमुख राजवर्धन पाटील, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य मारुती वणवे, माजी सरपंच पराग जाधव, पंचायत समितीचे माजी सभापती संजय देहाडे, अर्बन बॅंकेचे माजी अध्यक्ष अशोक शिंदे, तुषार खराडे, अभिजीत देवकाते, संचालक संजय जगताप, संपत बंडगर, तेजस देवकाते, अभिमन्यु खटके, प्रशांत वाघ, सुनिल वाघ, सुनिल काळे, सतीश काळे, विश्वास देवकाते, सुर्यकांत सवाणे, कपील भाकरे, गुराप्पा पवार, डॉ. महादेव वाळुंज उपस्थित होते.अंकिता पाटील ठाकरे म्हणाल्या, युवकांना रोजगार व नोकऱ्यांच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातुन विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. सेवा पंधरवाडयानिमित्त भाजप युवा मोर्चाच्या वतीने विधायक उपक्रम राबविण्यात येत आहेत. युवकांनी विधायक उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन डॉ. बाळासाहेब काळे यांनी केले. आभार डॉ. राजाराम गावडे यांनी मानले.रक्तदान शिबीरासाठी पुणे येथील अक्षय ब्लड बॅंक तसेच कला महाविदयालय, भिगवण येथील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.