भिगवणमध्ये लेखन कौशल्य विकास कार्यशाळा ..

भिगवण: शालेय जीवनात मुला-मुलींना अभ्यासात लेखन कौशल्य महत्त्वाचे आहे. यातूनच विद्यार्थी व्यक्तिमत्व विकासात बदल घडवू शकतो. याकरिता भिगवण मधील काही शाळांमध्ये मंगळवार दि. १४ ते गुरुवार दि. २३ फेब्रुवारी २०२३ दरम्यान दहा दिवसांची घड्याळी एक ते दीड तास याप्रमाणे ‘लेखन कौशल्य विकास कार्यशाळा’ आयोजित करण्यात आली असल्याची माहिती शिक्षक मित्र ज्ञान, कला, क्रीडा, संस्कार, कौशल्य विकास केंद्र कराड येथील मुख्य प्रशिक्षक सुहास दादा प्रभावळे यांनी दिली.

या कार्यशाळेत भिगवण येथील विठ्ठलराव थोरात इंग्लिश मीडियम स्कूल व आदर्श विद्यालय या दोन शाळांनी सहभाग घेतला आहे. या शाळा व्यतिरिक्त इतर शाळेतील मुलांना सुद्धा या कार्यशाळेमध्ये सहभागी होण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. अशा विद्यार्थ्यांची संख्या जास्त झाल्यास त्यांचे करिता वेगळी वेळ निवडून त्यांची स्वतंत्र कार्यशाळा सुद्धा घेण्याचा मानस प्रभावळे यांनी व्यक्त केला. अशा मुलांची संख्या पूर्ण न झाल्यास नियोजित शाळांच्या कार्यशाळेमध्ये त्या विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतले जाईल असेही ते म्हणाले. इयत्ता पाचवी ते नववी पर्यंत वयोगटातील मुले आणि मुले कार्यशाळेकरिता पात्र असल्याचे सांगून कार्यशाळेची वेळ आपल्या सोयीप्रमाणे चर्चा करून ठरविली जाणार असल्याचे ही त्यांनी सांगितले. ज्या मुला मुलींची अशा प्रकारच्या कार्यशाळेत सहभागी होण्याची इच्छा असेल त्यांनी ९९६०१८५०२० या क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले.





 

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here