भाषेच्या सहाय्याने प्रतिभा आधारित रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध – प्रा. निवृत्ती लोखंडे

इंदापूर : इंदापूर येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालया मध्ये राज्याचे माजी मंत्री व संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदी विभागातर्फे हिंदी दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अतिथी प्रा. निवृत्ती तानाजी लोखंडे, शंकरराव मोहिते महाविद्यालय अकलूज हे होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कला विभागाचे प्रमुख डॉ.भिमाजी भोर होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिंदी विभाग प्रमुख डॉ. सीता पवार मॅडमने केले. सन्माननीय अतिथी म्हणून प्रा. निवृत्ती लोखंडे जी यांनी हिंदी भाषेच्या विकासासाठी विद्यार्थ्यां ना हिंदी भाषेत उपलब्ध असलेल्या रोजगाराच्या संधी उदाहरणांसह स्पष्ट केल्या. ग्लॅमरने भरलेले चित्रपट क्षेत्र ज्यामध्ये कौशल्य आधारित रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. त्यात विशेषत: आजकाल लोकप्रिय असलेल्या चित्रपट गीतांमध्ये वापरल्या जाणाऱ्या जिज्ञासा वर्धक प्रभाव शब्दांचा प्रभाव प्रेक्षकांवर पडतो. अशा प्रकारची गाणी लिहिण्यात विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य पणाला लावले तर तेही करिअरचे साधन होऊ शकते. त्याचबरोबर शेअर बाजाराचे प्राथमिक ज्ञान घेऊन या क्षेत्रात संधीही उपलब्ध आहेत. डिजिटल मार्केटमध्ये, इंटरनेटवरही हिंदी भाषेच्या माध्यमातून नवनवीन नोकऱ्या उपलब्ध आहेत, हे सविस्तरपणे सांगितले.त्याच बरोबर अध्यक्षीय भाषणात डॉ.भिमाजी भोर सर यांनी राष्ट्राच्या विकासात भाषेचे महत्व सांगितले, तसेच देशाच्या प्रगतीसाठी व्यक्तिमत्व विकास किती महत्वाचा आहे यावर प्रकाश टाकला.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन सरवदे यांनी विद्यार्थ्यांना हिंदी दिनाच्या शुभेच्छा दिल्या.पिवली सेन ( कला द्वितीय वर्ष ) हि ने सूत्रसंचालन केले.कार्यक्रमाचे आभार प्रा वाघ एस. एन मॅडमने ते केले. या कार्य क्रमा साठी डॉ. शिवाजी वीर, डॉ राजेंद्र साळुंखे, प्रा डी. के.भोसले, डॉ. तानाजी कसबे, डॉ. बाबासाहेब काळे,प्रा. नामदेव पवार , डॉ. उत्तम वाघमारे उपस्थित होते. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला .

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here