भावी जिल्हा परिषद अमोलराजे इंगळे एक उत्तुंग नेतृत्व – अभिष्टचिंतन दिन विशेष लेख.

इंदापूर (प्रतिनिधी सचिन शिंदे): बाभूळगाव चे सर्वसामान्य कुटुंबातील एक प्रभावी आणि कार्यकुशल व्यक्तिमत्व असणारे ज्यांच्यावर आई-वडील व थोरल्या बंधूंचे सदैव छायाचित्राचा आशीर्वाद असणारे युवा उद्योजक अमोलराजे इंगळे यांच्या अभिष्टचिंतन दिन असून या निमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा. इंदापूर परिसरात प्रसिद्ध उद्योजक राजाभाऊ इंगळे त्यांचे थोरले बंधू असून त्यांच्या साथीने ते युवकांना नवीन व्यवसायस सुवर्ण संधी मिळावी.त्यांनी नोकरी पेक्षा व्यवसायाकडे वळून आपल्या जीवनाची प्रगती करावी म्हणून गुलाबराव इंगळे पेठची स्थापना करून त्याठिकाणी सुसज्ज शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारणी चालू आहे .यामध्ये अनेक युवा व्यावसायिकांकडून त्यात भरभरून प्रतिसाद मिळालेला आहे.अमोलराजे इंगळे मित्र परिवाराच्या वतीने त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या जात असून त्यांनी आपला मनमिळावू स्वभावतुन तालुक्यात आपल्या मैत्रीचा स्वभावातून अनेक युवकांनी आपल्या व्यवसायाची सुरुवात त्यांच्या हस्ते उद्घाटन घेऊन आशीर्वाद घेत सध्याचे आपले व्यवसायात प्रगती करीत असल्याचे दिसून येते. अशा परिवारातील अमोलराज इंगळे हे व्यवसाय क्षेत्राबरोबर ही सामाजिक क्षेत्रात अनेक विविध उपक्रमातून आपले कार्य करीत आहेत. तसेच गोरगरीब गरजू लोकांनाही ते प्रत्यक्ष मदत करतात त्यांच्या या कार्याचा सर्व ठिकाणी सर्वसामान्य मध्ये नेहमी चर्चा पाहण्यास मिळते. राजकीय क्षेत्रात कोणताही पदभार नसताना संबंधातील राजकीय नेते यांच्यामध्ये त्यांनी त्यांच्या मनामध्ये आपुलकीचे व विश्वासाचे स्थान मिळवून आपला राजकीय ठसा निर्माण केला आहे. त्याचा फायदा म्हणून वेगवेगळ्या निवडणुकीच्यावेळी त्यांचे उमेदवारीसाठी नेहमीच नाव चर्चेला येत असते. त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे कोणाशीही वैर न ठेवता सर्वांशी आपुलकीच्या नात्याने वागणारे धडाडीचे युवा उत्तुंग नेतृत्व म्हणजेच अमोलराजे इंगळे होय. त्यांना अभिष्टचिंतनाचा हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here