वैभव पाटील :पालघर जिल्हा प्रतिनिधी 9850868663
ग्रामीण भागामध्ये शिक्षण घेऊन अल्पकालावधीत उद्योजक बनलेले कुणाल सुरेश पाटील हे पालघर तालुक्यातील मांडे गावचे सुपुत्र,इलेक्ट्रॉनिक्स अँड आणि टेली कम्युनिकेशनचे इंजिनियर आहेत.पब्लिक इशू मॅनेजमेंट अँड ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये त्यांचा अनुभव दांडगा आहे.ते स्वतः एक उत्तम लीडरशिप आणि मोटिवेशनल वक्ता व ट्रेनर आहेत.ह्या आधी त्यांनी नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन गव्हर्मेंट ऑफ इंडिया, ह्यूमन राइट्स असोसिएशन,महाराष्ट्रातल्या विविध क्षेत्रातून त्यांचं शिक्षण झालेलं असल्यामुळे महाराष्ट्रातल्या विविध मानसिकतेचा आणि विविध भागांचा त्यांना एक चांगला अभ्यास आहे. सर्व-लोकसमावेशक अखंड भारताची पुनर्स्थापना हे त्यांचं ध्येय आहे. महान क्रांतिकारी महायोगी अरविंद घोष यांचे ते अनुयायी आहेत आणि हे चालू वर्ष भारताच्या स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष व अरविंद। घोष यांच्या जयंतीचे 150 वे वर्ष आहे, जे भारत सरकार तर्फे आधीच मागील सहा महिन्यांपासून साजरे होत आहे. युवा वर्गाला आधुनिकतेच्या काळात त्यांच्या कुटुंबाप्रती समाजाप्रती देशाप्रती जागृत आचार आणि जागृत विचार कसा करावा आणि कसं तत्पर राहावं यासाठी कुणाल पाटील हे मागील काही वर्षांपासून कार्यरत आहेत. आणि आता हे कार्य त्यांनी आपली जन्मभूमी असलेला पालघर जिल्ह्यासाठी करण्याचे उद्दिष्ट बाळगले आहे .त्यांना वाचन, क्रीडा सहकार क्षेत्राची सुद्धा आवड आहे.त्यांची भारत सरकार ग्रामीण विकास मंत्रालया द्वारा जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण पालघर, पालघर जिल्हा सदस्य पदी नियुक्ती झाल्याने त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
Home Uncategorized भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालय द्वारा कुणाल पाटील यांची जिल्हा विकास समन्वय...