भारताच्या स्वातंत्र्य अमृत महोत्सव निमित्त सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञाती हितवर्धक मंडळाचे ,वैद्यकीय शिबिर संपन्न 

भारताच्या स्वातंत्र्य अमृत महोत्सवाचे अवचित साधून सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञाती हितवर्धक मंडळ व नॅशनल हाय स्पीड रेल्वे कार्पोरेशन,(bullet train ) यांच्या संयुक्त विद्यमानाने व भक्ती वेदांत हॉस्पिटल व संशोधन संस्था श्री चैतन्य सेवा ट्रस्ट प्रकल्प,मिरा रोड यांच्या मदतीने मोफत नेत्र तपासणी आणि मोफत मोतीबिंदू ऑपरेशन शिबिर दि. 16 ऑगस्ट 2022 रोजी कै. गोविंदराव दादोबा ठाकूर सभागृह , कै. चिंतामण हरी महाले बाग पालघर, नवली येथे आयोजित करण्यात आले होते .मंडळाचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय संतोष पावडे यांनी शिबिराचे उद्घाटन केले. आजच्या मोफत नेत्र तपासणी आणि मोफत मोतीबिंदू ऑपरेशन शिबीराचे आयोजन मंडळाचे विद्यमान अध्यक्ष संतोष पावडे यांच्या पुढाकाराने व मंडळाचे कार्याध्यक्ष मुकेश महाले ,उपाध्यक्ष जयवंत हरिश्चंद्र राऊळ व सरचिटणीस संजय पाटील, आणि इतर मान्यवर पदाधिकारी यांच्या मेहनतीने यशस्वीरित्या पार पडले. ,या शिबिरामध्ये 80 रुग्णांची तपासणी करण्यात आली. या पैकी 26 रुग्णांना मोतीबिंदू ऑपरेशन करिता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती गोपीनाथ कोरडे प्रतिनिधी नॅशनल हाय स्पीड रेल कार्पोरेशन लिमिटेड बुलेट ट्रेन, रवींद्र (राजू) राऊळ संपादक सूर्यतेज , मंडळाचे विश्वस्त शरद पाटील , विजय पाटील , विष्णुकांत राऊळ,उमेश पाटील उपस्थित होते.ह्या शिबिरामध्ये सर्व धर्मीय, समाज बांधव व बुलेट ट्रेन प्रकल्प बाधित कार्यक्षेत्रातील बंधू व भगिनींनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवून मोफत नेत्र तपासणी आणि मोफत मोतीबिंदू ऑपरेशन शिबीराचा फायदा घेऊन शिबीर यशस्वी करण्यात हातभार लावला. सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञाती हितवर्धक मंडळ अशी नेहमीच समाज उपयोगी कार्यक्रम राबवत असते तसेच ह्या रुग्णाला मोतीबिंदूचे ऑपरेशन करण्याची गरज आहे अशा सर्व रुग्णांना नेण्या आणण्याची व राहण्याची खाण्यापिण्याची सर्व व्यवस्था नॅशनल हाय स्पीड रेल्वे कार्पोरेशन यांच्या सीएसआर फंडातून व भक्ती वेदांत हॉस्पिटलच्या सहकार्याने करण्यात आली असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष संतोष पावडे यांनी सांगितले शिबिरामध्ये वयोरुद्ध रुग्ण ज्यांनी आज आपल्या वयाची 75 पूर्ण केली आहे .गजानन पाटील पडघें यांचे पुष्प देऊन मंडळाच्या अध्यक्षांनी सन्मान केला. व त्यांचे मनोधैर्य वाढविले .

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here