भाजप शिवसेना युतीचा इंदापूर तालुक्यातील जनतेला चांगला अनुभव येईल – माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील

👉भाजप कार्यकर्त्यांना दिला कानमंत्र
👉 वालचंदनगरला कळस-वालचंदनगर व सणसर-लासुर्णे जि. प. गटाची संवाद बैठक
इंदापूर: भाजपचे केंद्रामधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्वाखालील मजबूत सरकार देशामध्ये अतिशय उत्कृष्टपणे काम करीत असून, जनहिताच्या अनेक योजना यशस्वीपणे राबवीत आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी या सर्व योजनांची माहिती जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचे काम करावे. आता राज्यातही युतीचे सरकार जनहिताचे अनेक निर्णय घेत आहे, असे प्रतिपादन भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी रविवारी (दि.17) केले.
वालचंदनगर येथे कळस-वालचंदनगर व सणसर-लासुर्णे जिल्हा परिषद गटातील भाजप कार्यकर्ते व कामगार यांच्या संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी कार्यकर्ते व कामगार यांच्या अडीअडचणी जाणून घेत मार्गदर्शन केले.ते पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रभावी नियोजनामुळे तळागाळातील जनतेला कोरोना काळापासून मोफत धान्य पुरवठा केला जात आहे. तर शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान सन्मान योजनेतून प्रति चार महिन्याला रु.2 हजार रुपये बँक खात्यात जमा केले जात आहेत. तसेच प्रधानमंत्री आवास योजना, उज्ज्वला योजना , प्रधानमंत्री पीक विमा योजना, आरोग्याच्या योजना, कोरोना प्रतिबंधक लसीकरण योजना अशा अनेक योजना जनतेपर्यंत पोहोचविणेसाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी सतर्क राहून जनतेशी संपर्कात राहावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच कामगारांच्या अडचणी संदर्भात कंपनी व्यवस्थापनासोबत बैठक लावून सर्व प्रश्न मार्गी लावले जातील, असे हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी सांगितले.
प्रास्ताविक दयानंद झेंडे यांनी केले. याप्रसंगी संजय नकाते यांनी वालचंदनगर येथील कामगार व कंपनी क्षेत्रातील परिस्थितीची माहिती दिली. यावेळी भाजपचे इंदापूर तालुकाध्यक्ष अॅड.शरद जामदार, अतुल तेरखेडकर यांनी मनोगत केले. यावेळी विलासराव माने, विलास वाघमोडे, अॅड. हेमंत नरुटे, प्रदीप पाटील, लालासाहेब पवार, कांतीलाल झगडे, सरपंच कुमार गायकवाड, सत्यशील पाटील, अंकुश रणमोडे, तुकाराम काळे, गजानन वाकसे, राजेंद्र गायकवाड, लालासो सपकळ, संग्राम निंबाळकर, अँड.विजय पांढरे, रवींद्र यादव, संतोष चव्हाण, बाबा निंबाळकर, रणजीत पाटील, माणिक भोसले, संजय थोरात, दीपक कदम, स्वप्निल माने, संजय पवार, सचिन धाकटे, अमोल थोरात, नामदेव शिंदे, विश्वजीत तावरे, प्रल्हाद इंदरकर, हरिश्चंद्र माने, अनिल शहा, शशिकांत माडगे, संतोष कदम, राजेंद्र रणमोडे, नलवडे दादा, मकरंद वाघ आदीसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रम प्रसंगी हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते वालचंदनगर सहकारी बँक निवडणुकीमध्ये स्वाभिमानी पॅनलने सर्व 12 जागी विजयी प्राप्त केल्याबद्दल नूतन संचालकांचा सत्कार करण्यात आला.
👉तालुक्यातील जनतेला चांगला अनुभव येईल -हर्षवर्धन पाटील-राज्यात भाजप-शिवसेना युतीचे मजबूत सरकार सत्तेवर आलेले आहे. त्यामुळे इंदापूर तालुक्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह व नवचैतन्य निर्माण झालेले आहे. आता इंदापूर तालुक्यातील जनतेला युती सरकारच्या कामकाजाचा निश्चितपणे चांगला अनुभव येईल, अशी ग्वाही हर्षवर्धन पाटील यांनी दिली.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here