इंदापूर:भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजना राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोचविणार असल्याचे मत निराभिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक आणि भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चा कोअर कमिटीचे प्रमुख राजवर्धन पाटील यांनी भाजपा युवा संघटनेतील कार्यकर्त्यांशी बोलताना आपले मत व्यक्त केले.
राजवर्धन पाटील यांनी इंदापूर येथे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेतली होती. यावेळी त्यांनी प्रत्येक गावामध्ये युवा मोर्चाच्या शाखेच्या माध्यमातून तसेच युवक संघटनेच्या सक्रिय सहभागातून केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले तसेच यावेळी त्यांनी युवकांना मार्गदर्शन केले.यावेळी युवा कार्यकर्त्यांनी देखील आपल्या गावातील युवा शाखेच्या माध्यमातून या सर्व योजना प्रभावपणे राबवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष शरद जामदार, भाजपा युवा मोर्चा इंदापूर तालुका अध्यक्ष तेजस देवकाते, भाजपा सोशल मीडियाचे साहेबराव पिसाळ , कर्मयोगीचे संचालक आबा शिंगाडे, प्रशांत गलांडे, राजेंद्र पवार तसेच भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे आणि सोशल मीडियाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.