भाजपात प्रवेशसत्र सुरूच: बिजवडी ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच दादाराम काळेल यांचा भाजपमध्ये प्रवेश.

इंदापूर : प्रतिनिधी- बिजवडी ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच दादाराम काळेल यांनी भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक कार्यकर्त्यांसह बिजवडी येथे सोमवारी ( दि.28) प्रवेश केला. त्यामुळे राष्ट्रवादी काँगेसला मोठा धक्का बसला आहे. यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी दादाराम काळेल व कार्यकर्त्यांचा सत्कार केला. यावेळी छगन भोंगळे, नारायण वीर, मच्छिंद्र अभंग, हिरालाल पारेकर, दिलीप भिसे, काळेल गुरुजी आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून इंदापूर तालुक्यातील वेगवेगळ्या भागातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते हे भाजपमध्ये प्रवेश करत असून, राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार धक्के बसत आहेत. काही दिवसांपूर्वी इंदापूर पंचायत समितीचे माजी उपसभापती कांतीलाल बोराटे, स्वप्निल सावंत आदी मान्यवरांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तर दोनच दिवसापूर्वीच काझड येतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here